मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1श्रद्धायुक्त प्रार्थना }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो; [QE][QS]दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो. [QE]
2. [QS]माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात; [QE][QS]कारण उद्धटपणे माझ्याविरूद्ध लढणारे अनेक आहेत. [QE]
3. [QS]मी जेव्हा घाबरतो, [QE][QS]तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन. [QE]
4. [QS]मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन, [QE][QS]मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही. [QE][QS]मनुष्य माझे काय करील? [QE]
5. [QS]दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात; [QE][QS]त्यांचे सर्व विचार माझ्याविरूद्ध माझ्या वाईटासाठी असतात. [QE]
6. [QS]ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात, [QE][QS]जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात. [QE]
7. [QS]त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको. [QE][QS]हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण. [QE]
8. [QS]तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत [QE][QS]आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत; [QE][QS]तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का? [QE]
9. [QS]मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील; [QE][QS]हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे. [QE]
10. [QS]मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. [QE][QS]मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. [QE]
11. [QS]मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील? [QE]
12. [QS]हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे; [QE][QS]मी तुला धन्यवादाची अर्पणे देईन. [QE]
13. [QS]कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे; [QE][QS]तू माझे पाय पडण्यापासून राखले, [QE][QS]यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशात [QE][QS]देवापुढे चालावे. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 56 / 150
श्रद्धायुक्त प्रार्थना 1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो; दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो. 2 माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात; कारण उद्धटपणे माझ्याविरूद्ध लढणारे अनेक आहेत. 3 मी जेव्हा घाबरतो, तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन. 4 मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन, मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करील? 5 दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात; त्यांचे सर्व विचार माझ्याविरूद्ध माझ्या वाईटासाठी असतात. 6 ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात, जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात. 7 त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको. हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण. 8 तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत; तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का? 9 मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील; हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे. 10 मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. 11 मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील? 12 हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे; मी तुला धन्यवादाची अर्पणे देईन. 13 कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे; तू माझे पाय पडण्यापासून राखले, यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशात देवापुढे चालावे.
Total 150 अध्याय, Selected धडा 56 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References