1. {श्रद्धायुक्त प्रार्थना} PS हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो;
दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो. |
4. मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन,
मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करील? |
5. दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात;
त्यांचे सर्व विचार माझ्याविरूद्ध माझ्या वाईटासाठी असतात. |
8. तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत
आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत; तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का? |
10. मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.
मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. |
13. कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे;
तू माझे पाय पडण्यापासून राखले, यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशात देवापुढे चालावे. PE |