मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {छळणाऱ्यांच्या हातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना} [PS] हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, [QBR] कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत [QBR] तुझ्यात आश्रय घेतो. [QBR]
2. मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्वकाही करतो [QBR] त्याचा मी धावा करीन. [QBR]
3. तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो, [QBR] जेव्हा मनुष्य मला गिळून टाकण्याची इच्छा करतो तेव्हा तो त्यास धमकावतो; [QBR] देव त्याच्या कराराची विश्वसनीयता आणि त्याचा विश्वासूपणा मला दाखवतो. [QBR]
4. माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे; [QBR] ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, [QBR] आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे [QBR] अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने रहावे लागत आहे. [QBR]
5. हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो; [QBR] तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर होवो. [QBR]
6. त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे; [QBR] माझा जीव वाकून गेला आहे; [QBR] त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे, [QBR] परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत. [QBR]
7. हे देवा, माझे हृदय स्थिर आहे, माझे हृदय स्थिर आहे; [QBR] मी गाईन, होय, मी स्तुती गाईन. [QBR]
8. हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो; [QBR] हे सतारी आणि वीणे, जागे व्हा; [QBR] मी पहाटेला जागे करीन. [QBR]
9. हे प्रभू, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन; [QBR] मी सर्व राष्ट्रांमध्ये तुझी स्तवने गाईन. [QBR]
10. कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे [QBR] आणि तुझा विश्वासूपणा ढगापर्यंत पोहचतो. [QBR]
11. हे देवा, तू आकाशाच्या वर उंचविला जावो; [QBR] तुझा महिमा सर्व पृथ्वीवर उंच होवो. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 57 / 150
स्तोत्रसंहिता 57:72
छळणाऱ्यांच्या हातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना 1 हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत तुझ्यात आश्रय घेतो. 2 मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्वकाही करतो त्याचा मी धावा करीन. 3 तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो, जेव्हा मनुष्य मला गिळून टाकण्याची इच्छा करतो तेव्हा तो त्यास धमकावतो; देव त्याच्या कराराची विश्वसनीयता आणि त्याचा विश्वासूपणा मला दाखवतो. 4 माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने रहावे लागत आहे. 5 हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो; तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर होवो. 6 त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे; माझा जीव वाकून गेला आहे; त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे, परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत. 7 हे देवा, माझे हृदय स्थिर आहे, माझे हृदय स्थिर आहे; मी गाईन, होय, मी स्तुती गाईन. 8 हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो; हे सतारी आणि वीणे, जागे व्हा; मी पहाटेला जागे करीन. 9 हे प्रभू, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन; मी सर्व राष्ट्रांमध्ये तुझी स्तवने गाईन. 10 कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे आणि तुझा विश्वासूपणा ढगापर्यंत पोहचतो. 11 हे देवा, तू आकाशाच्या वर उंचविला जावो; तुझा महिमा सर्व पृथ्वीवर उंच होवो.
Total 150 अध्याय, Selected धडा 57 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References