1. {दुष्टाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना} PS अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का?
अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का? |
5. गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी
त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत. |
7. जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत;
जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत. |
8. गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते,
जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत. |
9. तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच,
ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील. |
10. नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल;
तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल. |
11. म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे;
खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.” PE |