मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {दुष्टाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना} [PS] अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? [QBR] अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का? [QBR]
2. नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता; [QBR] तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता. [QBR]
3. दुष्ट उदरापासूनच दुरावतात; [QBR] ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात. [QBR]
4. त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, [QBR] जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत; [QBR]
5. गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी [QBR] त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत. [QBR]
6. हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड; [QBR] हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक; [QBR]
7. जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत; [QBR] जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत. [QBR]
8. गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते, [QBR] जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत. [QBR]
9. तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच, [QBR] ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील. [QBR]
10. नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल; [QBR] तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल. [QBR]
11. म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; [QBR] खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.” [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 58 / 150
स्तोत्रसंहिता 58:81
दुष्टाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना 1 अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का? 2 नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता. 3 दुष्ट उदरापासूनच दुरावतात; ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात. 4 त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत; 5 गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत. 6 हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड; हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक; 7 जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत; जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत. 8 गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते, जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत. 9 तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच, ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील. 10 नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल; तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल. 11 म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.”
Total 150 अध्याय, Selected धडा 58 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References