1. {शत्रूंच्या हातातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना} PS हे देवा, मला माझ्या शत्रूंपासून सोडीव;
जे माझ्याविरूद्ध उठतात त्यांच्यापासून मला दूर उंचावर ठेव. |
3. कारण, पाहा, ते माझ्या जीवासाठी दबा धरून बसले आहेत.
हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा पातक नसता, सामर्थी लोक माझ्याविरूद्ध एकत्र गोळा झाले आहेत. |
4. जरी मी निर्दोष असलो तरी ते माझ्याकडे धावण्याची तयारी करत आहेत;
मला मदत करावी म्हणून जागा हो व पाहा. |
5. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, इस्राएलाच्या देवा,
ऊठ आणि सर्व राष्ट्रांना शिक्षा कर; कोणत्याही दुष्ट पापी मनुष्यास दया दाखवू नकोस. |
7. पाहा, ते आपल्या मुखावाटे ढेकर देतात;
त्यांच्या तोंडचे शब्द तलवार आहेत. कारण ते म्हणतात, आमचे कोण ऐकतो? |
10. माझा देव मला त्याच्या कराराच्या विश्वसनीयतेने भेटेल;
माझ्या शत्रूवर माझी इच्छा पूर्ण झालेली देव मला पाहू देईल. |
11. त्यांना जिवे मारू नको नाहीतर माझे लोक विसरून जातील;
हे प्रभू तू आमची ढाल आहेस, आपल्या बलाने त्यांची दाणादाण कर, त्यांस खाली पाड. |
12. कारण त्यांच्या तोंडचे पाप आणि त्यांच्या ओठांचे शब्द,
आणि त्यांनी अभिव्यक्त केलेले शाप आणि खोटेपणा यामुळे ते आपल्या अंहकारात पकडले जातात. |
13. क्रोधात त्यांना नष्ट कर, ते यापुढे नाहीसे व्हावेत असे त्यांना नष्ट कर.
देव याकोबात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत राज्य करतो हे त्यांना माहित होवो. |
16. परंतु मी तुझ्या सामर्थ्याविषयी गीत गाईन; कारण तू माझा उंच बुरूज आहे
आणि माझ्या संकटाच्या समयी आश्रयस्थान आहेस. |
17. हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तवने गाईन;
कारण देव माझा उंच बुरूज आहे, माझा देव ज्यावर मी विश्वास ठेऊ शकतो. PE |