1. {#1शत्रूंच्या हातातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे देवा, मला माझ्या शत्रूंपासून सोडीव; [QE][QS]जे माझ्याविरूद्ध उठतात त्यांच्यापासून मला दूर उंचावर ठेव. [QE]
2. [QS]दुष्कर्म करणाऱ्यांपासून मला सुरक्षित ठेव, [QE][QS]आणि रक्तपाती मनुष्यापासून मला वाचव. [QE]
3. [QS]कारण, पाहा, ते माझ्या जीवासाठी दबा धरून बसले आहेत. [QE][QS]हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा पातक नसता, [QE][QS]सामर्थी लोक माझ्याविरूद्ध एकत्र गोळा झाले आहेत. [QE]
4. [QS]जरी मी निर्दोष असलो तरी ते माझ्याकडे धावण्याची तयारी करत आहेत; [QE][QS]मला मदत करावी म्हणून जागा हो व पाहा. [QE]
5. [QS]हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, इस्राएलाच्या देवा, [QE][QS]ऊठ आणि सर्व राष्ट्रांना शिक्षा कर; [QE][QS]कोणत्याही दुष्ट पापी मनुष्यास दया दाखवू नकोस. [QE]
6. [QS]संध्याकाळी ते परत येतात, कुत्र्यांसारखे गुरगुरतात [QE][QS]आणि नगराभोवती फिरतात. [QE]
7. [QS]पाहा, ते आपल्या मुखावाटे ढेकर देतात; [QE][QS]त्यांच्या तोंडचे शब्द तलवार आहेत. [QE][QS]कारण ते म्हणतात, आमचे कोण ऐकतो? [QE]
8. [QS]परंतु हे परमेश्वरा, तू त्यांना हसशील; [QE][QS]तू सर्व राष्ट्रांना उपहासात धरशील. [QE]
9. [QS]हे माझ्या सामर्थ्या, मी तुझ्याकडे लक्ष देईन; [QE][QS]कारण देवच माझा उंच बुरूज आहे. [QE]
10. [QS]माझा देव मला त्याच्या कराराच्या विश्वसनीयतेने भेटेल; [QE][QS]माझ्या शत्रूवर माझी इच्छा पूर्ण झालेली देव मला पाहू देईल. [QE]
11. [QS]त्यांना जिवे मारू नको नाहीतर माझे लोक विसरून जातील; [QE][QS]हे प्रभू तू आमची ढाल आहेस, आपल्या बलाने त्यांची दाणादाण कर, त्यांस खाली पाड. [QE]
12. [QS]कारण त्यांच्या तोंडचे पाप आणि त्यांच्या ओठांचे शब्द, [QE][QS]आणि त्यांनी अभिव्यक्त केलेले शाप [QE][QS]आणि खोटेपणा यामुळे ते आपल्या अंहकारात पकडले जातात. [QE]
13. [QS]क्रोधात त्यांना नष्ट कर, ते यापुढे नाहीसे व्हावेत असे त्यांना नष्ट कर. [QE][QS]देव याकोबात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत [QE][QS]राज्य करतो हे त्यांना माहित होवो. [QE]
14. [QS]संध्याकाळी ते परत येतात; कुत्र्यांसारखे गुरगुरतात. [QE][QS]आणि रात्री नगराभोवती फिरतात. [QE]
15. [QS]ते अन्नासाठी वर आणि खाली भटकतात, [QE][QS]आणि जर त्यांची तृप्ति झाली नाही तर रात्रभर वाट पाहतात. [QE]
16. [QS]परंतु मी तुझ्या सामर्थ्याविषयी गीत गाईन; कारण तू माझा उंच बुरूज आहे [QE][QS]आणि माझ्या संकटाच्या समयी आश्रयस्थान आहेस. [QE]
17. [QS]हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तवने गाईन; [QE][QS]कारण देव माझा उंच बुरूज आहे, [QE][QS]माझा देव ज्यावर मी विश्वास ठेऊ शकतो. [QE]