मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1अडचणीच्या प्रसंगी दयेची याचना }[PS]*मुख्य वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस, [QE][QS]किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस. [QE]
2. [QS]हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. [QE][QS]हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत. [QE]
3. [QS]माझा जीव फार घाबरला आहे. [QE][QS]परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे? [QE]
4. [QS]हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! [QE][QS]तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार. [QE]
5. [QS]कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. [QE][QS]मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार? [QE]
6. [QS]मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. [QE][QS]रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. [QE][QS]मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो. [QE]
7. [QS]शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. [QE][QS]माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत. [QE]
8. [QS]अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. [QE][QS]कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. [QE]
9. [QS]परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; [QE][QS]त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे. [QE]
10. [QS]माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील. [QE][QS]ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 6 / 150
अडचणीच्या प्रसंगी दयेची याचना 1 *मुख्य वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. *हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस, किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस. 2 हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत. 3 माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे? 4 हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार. 5 कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार? 6 मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो. 7 शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत. 8 अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. 9 परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे. 10 माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील. ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील.
Total 150 अध्याय, Selected धडा 6 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References