1. {शत्रूला विरोध करण्यासाठी साहाय्याची याचना} [PS] हे देवा, तू आम्हास टाकून दिले आहेस; तू आम्हास फाडून खाली टाकले आहे; आमच्यावर रागावला आहेस; [QBR] तू आम्हांस पुन्हा पूर्वस्थितीवर आण. [QBR]
2. तू भूमी कंपित केली आहेस; तू ती फाडून वेगळी केली; तिचे खिंडार बरे कर, [QBR] कारण ती हादरत आहे. [QBR]
3. तू तुझ्या लोकांस कठीण गोष्टी दाखवल्या आहेत; [QBR] तू आम्हास झिंगवण्यास लावणारा द्राक्षरस पाजला आहे. [QBR]
4. तुझा आदर करणाऱ्यास तू निशाण दिले आहे, [QBR] यासाठी की, त्यांनी सत्याकरता तो उभारावा. [QBR]
5. ज्यांच्यावर तू प्रेम करतो त्यांची सुटका व्हावी, [QBR] म्हणून तुझ्या उजव्या हाताने आमची सुटका कर आणि आम्हास उत्तर दे. [QBR]
6. देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी जल्लोष करीन; [QBR] मी शखेमाची वाटणी करीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन. [QBR]
7. गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे; [QBR] एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे; [QBR] यहूदा माझा राजदंड आहे. [QBR]
8. मवाब माझे धुण्याचे पात्र आहे; [QBR] अदोमावर मी माझे पादत्राण फेकीन; [QBR] मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन. [QBR]
9. मला बळकट नगरात कोण नेईल? [QBR] मला अदोमात कोण नेईल? [QBR]
10. हे देवा, तू आम्हास नाकारले नाही? [QBR] परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस. [QBR]
11. तू आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत कर, [QBR] कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे. [QBR]
12. आम्ही देवाच्या मदतीने विजयी होऊ; [QBR] तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडविल. [PE]