मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1आपली भिस्त केवळ देवावर }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे; [QE][QS]त्याच्यापासून माझे तारण येते. [QE]
2. [QS]तोच केवळ माझा खडक आणि माझे तारण आहे; [QE][QS]तो माझा उंच बुरूज आहे; मी कधीही ढळणार नाही. [QE]
3. [QS]झुकलेल्या भिंतीसारख्या, कोसळलेल्या कुंपणासारखा झालेल्या, [QE][QS]एका मनुष्यास मारण्यासाठी तुम्ही सर्वजण [QE][QS]किती काळपर्यंत त्याच्यावर हल्ला करून याल? [QE]
4. [QS]त्याच्या उच्च पदापासून त्यास खाली आणण्यासाठी मात्र ते सल्ला घेतात; [QE][QS]त्यांना लबाड बोलण्यास आवडते; [QE][QS]ते आपल्या मुखाने आशीर्वाद देतात, पण त्यांच्या अंतःकरणातून शाप देतात. [QE]
5. [QS]हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर; [QE][QS]कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे. [QE]
6. [QS]तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे; [QE][QS]तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही. [QE]
7. [QS]माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे; [QE][QS]माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे. [QE]
8. [QS]अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा; [QE][QS]त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा; [QE][QS]देव आमच्यासाठी आश्रय आहे. [QE]
9. [QS]खरोखर नीच माणसे निरर्थक आहेत, आणि उच्च माणसे लबाड आहेत; [QE][QS]वजन केले असता हलके भरतील; त्यांना मापले असता ते केवळ मिथ्या आहेत. [QE]
10. [QS]दडपशाहीवर आणि चोरीवर भरवसा ठेवू नका; [QE][QS]आणि संपत्तित निरुपयोगी आशा ठेवू नका; [QE]
11. [QS]देव एकदा बोलला आहे, [QE][QS]मी दोनदा ऐकले आहे, [QE][QS]सामर्थ्य देवाचे आहे. [QE]
12. [QS]हे प्रभू, तुझ्या ठायी प्रेमदया आहे. [QE][QS]कारण प्रत्येक मनुष्यास त्याने जसे केले आहे त्याप्रमाणे तू प्रतिफळ देतोस. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 62 / 150
आपली भिस्त केवळ देवावर 1 दाविदाचे स्तोत्र माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे; त्याच्यापासून माझे तारण येते. 2 तोच केवळ माझा खडक आणि माझे तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी कधीही ढळणार नाही. 3 झुकलेल्या भिंतीसारख्या, कोसळलेल्या कुंपणासारखा झालेल्या, एका मनुष्यास मारण्यासाठी तुम्ही सर्वजण किती काळपर्यंत त्याच्यावर हल्ला करून याल? 4 त्याच्या उच्च पदापासून त्यास खाली आणण्यासाठी मात्र ते सल्ला घेतात; त्यांना लबाड बोलण्यास आवडते; ते आपल्या मुखाने आशीर्वाद देतात, पण त्यांच्या अंतःकरणातून शाप देतात. 5 हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर; कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे. 6 तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही. 7 माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे; माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे. 8 अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा; त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा; देव आमच्यासाठी आश्रय आहे. 9 खरोखर नीच माणसे निरर्थक आहेत, आणि उच्च माणसे लबाड आहेत; वजन केले असता हलके भरतील; त्यांना मापले असता ते केवळ मिथ्या आहेत. 10 दडपशाहीवर आणि चोरीवर भरवसा ठेवू नका; आणि संपत्तित निरुपयोगी आशा ठेवू नका; 11 देव एकदा बोलला आहे, मी दोनदा ऐकले आहे, सामर्थ्य देवाचे आहे. 12 हे प्रभू, तुझ्या ठायी प्रेमदया आहे. कारण प्रत्येक मनुष्यास त्याने जसे केले आहे त्याप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.
Total 150 अध्याय, Selected धडा 62 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References