1. {आपली भिस्त केवळ देवावर} PS माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे;
त्याच्यापासून माझे तारण येते. |
3. झुकलेल्या भिंतीसारख्या, कोसळलेल्या कुंपणासारखा झालेल्या,
एका मनुष्यास मारण्यासाठी तुम्ही सर्वजण किती काळपर्यंत त्याच्यावर हल्ला करून याल? |
4. त्याच्या उच्च पदापासून त्यास खाली आणण्यासाठी मात्र ते सल्ला घेतात;
त्यांना लबाड बोलण्यास आवडते; ते आपल्या मुखाने आशीर्वाद देतात, पण त्यांच्या अंतःकरणातून शाप देतात. |
8. अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा;
त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा; देव आमच्यासाठी आश्रय आहे. |
9. खरोखर नीच माणसे निरर्थक आहेत, आणि उच्च माणसे लबाड आहेत;
वजन केले असता हलके भरतील; त्यांना मापले असता ते केवळ मिथ्या आहेत. |
12. हे प्रभू, तुझ्या ठायी प्रेमदया आहे.
कारण प्रत्येक मनुष्यास त्याने जसे केले आहे त्याप्रमाणे तू प्रतिफळ देतोस. PE |