मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
स्तोत्रसंहिता
1. {#1देव तान्हेल्या जिवांचे समाधान करतो }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन; [QE][QS]शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे; [QE][QS]माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे. [QE]
2. [QS]म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी [QE][QS]मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे. [QE]
3. [QS]कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे; [QE][QS]माझे ओठ तुझी स्तुती करतील. [QE]
4. [QS]म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन; [QE][QS]मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन. [QE]
5. [QS]माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल; [QE][QS]माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील. [QE]
6. [QS]मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो [QE][QS]आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो. [QE]
7. [QS]कारण तू माझे सहाय्य आहे, [QE][QS]आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे. [QE]
8. [QS]माझा जीव तुला चिकटून राहतो; [QE][QS]तुझा उजवा हात मला आधार देतो. [QE]
9. [QS]पण जे माझ्या जिवाचा नाश करण्याचा शोध घेतात [QE][QS]ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील. [QE]
10. [QS]त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल; [QE][QS]त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील. [QE]
11. [QS]परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल; [QE][QS]जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल, [QE][QS]पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 63 / 150
देव तान्हेल्या जिवांचे समाधान करतो 1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन; शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे; माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे. 2 म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे. 3 कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे; माझे ओठ तुझी स्तुती करतील. 4 म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन; मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन. 5 माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल; माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील. 6 मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो. 7 कारण तू माझे सहाय्य आहे, आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे. 8 माझा जीव तुला चिकटून राहतो; तुझा उजवा हात मला आधार देतो. 9 पण जे माझ्या जिवाचा नाश करण्याचा शोध घेतात ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील. 10 त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल; त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील. 11 परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल; जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल, पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल.
Total 150 अध्याय, Selected धडा 63 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References