मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {गुप्त शत्रूंपासून बचाव व्हावा म्हणून प्रार्थना} [PS] हे देवा, माझी वाणी ऐक, माझ्या गाऱ्हाण्याकडे कान दे; [QBR] माझ्या शत्रूंच्या भीतीपासून माझा जीव सुरक्षित ठेव. [QBR]
2. वाईट करणाऱ्याच्या गुप्त कारस्थानापासून, [QBR] अन्याय करणाऱ्याच्या गोंधळापासून मला लपव, [QBR]
3. त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे. [QBR] त्यांनी आपले बाण म्हणजे कडू शब्द मारण्यास नेम धरला आहे. [QBR]
4. याकरिता ते गुप्त जागेतून जे कोणी निरपराध आहेत त्यांच्यावर मारा करतात; [QBR] अचानक ते त्यांच्यावर मारा करतात आणि भीत नाहीत; [QBR]
5. ते आपणाला वाईट योजनेत उत्त्तेजन देतात; ते खाजगीत एकत्रित येऊन सापळा रचण्याचा सल्लामसलत करतात; [QBR] ते म्हणतात, आपल्याला कोण पाहील? [QBR]
6. ते पापी योजना शोधून काढतात; ते म्हणतात, [QBR] आम्ही काळजीपूर्वक योजना समाप्त केली आहे. [QBR] मनुष्याचे अंतःकरण आणि अंतरीक विचार खोल आहेत. [QBR]
7. परंतु देव त्यांच्यावर बाण सोडील; [QBR] अचानक ते त्याच्या बाणाने जखमी होतील. [QBR]
8. त्यांचीच जीभ त्यांच्याविरुद्ध होऊन ते अडखळविले जातील; [QBR] जे सर्व त्यांना पाहतील ते आपले डोके डोलवतील. [QBR]
9. सर्व लोक भितील आणि देवाची कृत्ये जाहीर करतील. [QBR] ते सूज्ञतेने त्याने जे काही केले त्याविषयी विचार करतील. [QBR]
10. परमेश्वराच्या ठायी नीतिमान आनंद करतील आणि त्याच्यात आश्रय घेतील; [QBR] सर्व सरळमार्गी त्याच्यात अभिमान बाळगतील. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 64 / 150
स्तोत्रसंहिता 64:114
गुप्त शत्रूंपासून बचाव व्हावा म्हणून प्रार्थना 1 हे देवा, माझी वाणी ऐक, माझ्या गाऱ्हाण्याकडे कान दे; माझ्या शत्रूंच्या भीतीपासून माझा जीव सुरक्षित ठेव. 2 वाईट करणाऱ्याच्या गुप्त कारस्थानापासून, अन्याय करणाऱ्याच्या गोंधळापासून मला लपव, 3 त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे. त्यांनी आपले बाण म्हणजे कडू शब्द मारण्यास नेम धरला आहे. 4 याकरिता ते गुप्त जागेतून जे कोणी निरपराध आहेत त्यांच्यावर मारा करतात; अचानक ते त्यांच्यावर मारा करतात आणि भीत नाहीत; 5 ते आपणाला वाईट योजनेत उत्त्तेजन देतात; ते खाजगीत एकत्रित येऊन सापळा रचण्याचा सल्लामसलत करतात; ते म्हणतात, आपल्याला कोण पाहील? 6 ते पापी योजना शोधून काढतात; ते म्हणतात, आम्ही काळजीपूर्वक योजना समाप्त केली आहे. मनुष्याचे अंतःकरण आणि अंतरीक विचार खोल आहेत. 7 परंतु देव त्यांच्यावर बाण सोडील; अचानक ते त्याच्या बाणाने जखमी होतील. 8 त्यांचीच जीभ त्यांच्याविरुद्ध होऊन ते अडखळविले जातील; जे सर्व त्यांना पाहतील ते आपले डोके डोलवतील. 9 सर्व लोक भितील आणि देवाची कृत्ये जाहीर करतील. ते सूज्ञतेने त्याने जे काही केले त्याविषयी विचार करतील. 10 परमेश्वराच्या ठायी नीतिमान आनंद करतील आणि त्याच्यात आश्रय घेतील; सर्व सरळमार्गी त्याच्यात अभिमान बाळगतील.
Total 150 अध्याय, Selected धडा 64 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References