1. {गुप्त शत्रूंपासून बचाव व्हावा म्हणून प्रार्थना} PS हे देवा, माझी वाणी ऐक, माझ्या गाऱ्हाण्याकडे कान दे;
माझ्या शत्रूंच्या भीतीपासून माझा जीव सुरक्षित ठेव. |
3. त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे.
त्यांनी आपले बाण म्हणजे कडू शब्द मारण्यास नेम धरला आहे. |
4. याकरिता ते गुप्त जागेतून जे कोणी निरपराध आहेत त्यांच्यावर मारा करतात;
अचानक ते त्यांच्यावर मारा करतात आणि भीत नाहीत; |
5. ते आपणाला वाईट योजनेत उत्त्तेजन देतात; ते खाजगीत एकत्रित येऊन सापळा रचण्याचा सल्लामसलत करतात;
ते म्हणतात, आपल्याला कोण पाहील? |
6. ते पापी योजना शोधून काढतात; ते म्हणतात,
आम्ही काळजीपूर्वक योजना समाप्त केली आहे. मनुष्याचे अंतःकरण आणि अंतरीक विचार खोल आहेत. |
8. त्यांचीच जीभ त्यांच्याविरुद्ध होऊन ते अडखळविले जातील;
जे सर्व त्यांना पाहतील ते आपले डोके डोलवतील. |
9. सर्व लोक भितील आणि देवाची कृत्ये जाहीर करतील.
ते सूज्ञतेने त्याने जे काही केले त्याविषयी विचार करतील. |
10. परमेश्वराच्या ठायी नीतिमान आनंद करतील आणि त्याच्यात आश्रय घेतील;
सर्व सरळमार्गी त्याच्यात अभिमान बाळगतील. PE |