मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकारस्तुती }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो; [QE][QS]तुला केलेला आमचा नवस तेथे फेडण्यात येईल. [QE]
2. [QS]जो तू प्रार्थना ऐकतोस, [QE][QS]त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. [QE]
3. [QS]दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे. [QE][QS]आमचे अपराध तर तूच क्षमा करशील. [QE]
4. [QS]ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे, [QE][QS]याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे. [QE][QS]तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्या [QE][QS]उत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ. [QE]
5. [QS]हे आमच्या तारणाऱ्या देवा, [QE][QS]जो तू पृथ्वीच्या सर्व सीमांचा [QE][QS]आणि दूर समुद्रावर जे आहेत त्यांचा भरवसा आहेस, [QE][QS]तो तू न्यायीपणाने अतिआश्चर्यकारक गोष्टींनी आम्हास उत्तरे देतोस. [QE]
6. [QS]कारण तू आपल्या सामर्थ्याने कंबर बांधून, [QE][QS]पर्वत दृढ केले आहेत. [QE]
7. [QS]तू गर्जणाऱ्या समुद्राला, [QE][QS]त्यांच्या लाटांच्या गर्जनेला [QE][QS]आणि लोकांचा गलबला शांत करतो. [QE]
8. [QS]जे पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागामध्ये राहतात ते तुझ्या कृत्याच्या चिन्हांमुळे भितात; [QE][QS]तू पूर्व आणि पश्चिम यांना आनंदित करतोस. [QE]
9. [QS]तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस; [QE][QS]तू तिला फारच समृद्ध करतोस; [QE][QS]देवाची नदी जलपूर्ण आहे; [QE][QS]तू भूमी तयार करून मनुष्यजातीला धान्य पुरवतोस. [QE]
10. [QS]तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस; [QE][QS]तू तिचे उंचवटे सपाट करतोस; [QE][QS]तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. [QE][QS]तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस [QE]
11. [QS]तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस; [QE][QS]तुझ्या रथामागील वाटेतून पृथ्वीवर खाली समृद्धी गाळतो. [QE]
12. [QS]रानातील कुरणावर त्या समृद्धी गाळतात [QE][QS]आणि डोंगर उल्लासाने वेढलेले आहेत. [QE]
13. [QS]कुरणांनी कळप पांघरले आहेत; [QE][QS]दऱ्यासुद्धा धान्यांनी झाकल्या आहेत. [QE][QS]ते आनंदाने आरोळी मारीत आहेत आणि ते गात आहेत. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 65 / 150
निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकारस्तुती 1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो; तुला केलेला आमचा नवस तेथे फेडण्यात येईल. 2 जो तू प्रार्थना ऐकतोस, त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. 3 दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे. आमचे अपराध तर तूच क्षमा करशील. 4 ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे, याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे. तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्या उत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ. 5 हे आमच्या तारणाऱ्या देवा, जो तू पृथ्वीच्या सर्व सीमांचा आणि दूर समुद्रावर जे आहेत त्यांचा भरवसा आहेस, तो तू न्यायीपणाने अतिआश्चर्यकारक गोष्टींनी आम्हास उत्तरे देतोस. 6 कारण तू आपल्या सामर्थ्याने कंबर बांधून, पर्वत दृढ केले आहेत. 7 तू गर्जणाऱ्या समुद्राला, त्यांच्या लाटांच्या गर्जनेला आणि लोकांचा गलबला शांत करतो. 8 जे पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागामध्ये राहतात ते तुझ्या कृत्याच्या चिन्हांमुळे भितात; तू पूर्व आणि पश्चिम यांना आनंदित करतोस. 9 तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस; तू तिला फारच समृद्ध करतोस; देवाची नदी जलपूर्ण आहे; तू भूमी तयार करून मनुष्यजातीला धान्य पुरवतोस. 10 तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस; तू तिचे उंचवटे सपाट करतोस; तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस 11 तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस; तुझ्या रथामागील वाटेतून पृथ्वीवर खाली समृद्धी गाळतो. 12 रानातील कुरणावर त्या समृद्धी गाळतात आणि डोंगर उल्लासाने वेढलेले आहेत. 13 कुरणांनी कळप पांघरले आहेत; दऱ्यासुद्धा धान्यांनी झाकल्या आहेत. ते आनंदाने आरोळी मारीत आहेत आणि ते गात आहेत.
Total 150 अध्याय, Selected धडा 65 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References