1. {देवाच्या महत्कृत्यांबद्दल उपकारस्तुती} [PS] अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा; [QBR]
2. त्याच्या नावाचा महिमा गा; [QBR] त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा. [QBR]
3. देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत, [QBR] तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात. [QBR]
4. सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील; [QBR] आणि तुझी स्तोत्रे गातील; [QBR] ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. [QBR]
5. अहो या, आणि देवाची कार्ये पहा; [QBR] तो मनुष्यांच्या मुलांस आपल्या कृत्यांनी धाक बसवतो. [QBR]
6. त्याने समुद्र पालटून कोरडी भूमी केली; [QBR] ते नदीतून पायांनी चालत गेले; [QBR] तेथे आम्ही त्याच्यात आनंद केला. [QBR]
7. तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करतो; [QBR] तो आपल्या डोळ्यांनी सर्व राष्ट्रांचे निरीक्षण करतो; [QBR] बंडखोरांनी आपल्यास उंच करू नये. [QBR]
8. अहो लोकांनो, आमच्या देवाला धन्यवाद द्या, [QBR] आणि त्याची स्तुती ऐकू येईल अशी करा. [QBR]
9. तो आमचा जीव राखून ठेवतो, [QBR] आणि तो आमचे पाय सरकू देत नाही. [QBR]
10. कारण हे देवा, तू आमची परीक्षा केली आहे; [QBR] रुप्याची परीक्षा करतात तशी तू आमची परीक्षा केली आहे. [QBR]
11. तू आम्हास जाळ्यात आणले; [QBR] तू आमच्या कमरेवर अवजड ओझे ठेवले. [QBR]
12. तू आमच्या डोक्यावरून लोकांस स्वारी करण्यास लावले. [QBR] आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून गेलो, [QBR] परंतु तू आम्हास बाहेर काढून प्रशस्त जागी आणले. [QBR]
13. मी होमार्पणे घेऊन तुझ्या घरात येईन; [QBR] मी तुला केलेले नवस फेडीन. [QBR]
14. संकटात असता जे मी आपल्या ओठांनी उच्चारले [QBR] आणि जे मी आपल्या तोंडाने बोलल, [QBR]
15. मी तुला मेंढ्याच्या धूपासहित [QBR] पुष्ट पशूंचे होमार्पणे मी तुला अर्पीण; [QBR] बोकड आणि गोऱ्हे अर्पीण. [QBR]
16. जे सर्व तुम्ही देवाचे भय धरता, या आणि ऐका, [QBR] आणि त्याने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हास सांगतो. [QBR]
17. मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला, [QBR] आणि माझ्या जीभेवर त्याची स्तुती होती. [QBR]
18. जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असते, [QBR] तर प्रभूने माझे ऐकले नसते. [QBR]
19. पण देवाने खचित ऐकले आहे; [QBR] त्याने माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे लक्ष दिले आहे. [QBR]
20. देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझ्या प्रार्थनांपासून आपले मुख फिरविले नाही, [QBR] किंवा त्याच्या कराराच्या विश्वासूपणापासून आपली दृष्टी वळविली नाही. [PE]