मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देवाचे उपकारस्मरण करण्याचा राष्ट्रांना आदेश} [PS] देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. [QBR] आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा. [QBR]
2. याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, [QBR] तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे. [QBR]
3. हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; [QBR] सर्व लोक तुझी स्तुती करोत. [QBR]
4. राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, [QBR] कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील [QBR] आणि राष्ट्रावर राज्य करशील. [QBR]
5. हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; [QBR] सर्व लोक तुझी स्तुती करोत. [QBR]
6. भूमीने आपला हंगाम दिला आहे [QBR] आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो. [QBR]
7. देव आम्हास आशीर्वाद देवो आणि [QBR] पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 67 / 150
स्तोत्रसंहिता 67:154
देवाचे उपकारस्मरण करण्याचा राष्ट्रांना आदेश 1 देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा. 2 याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे. 3 हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत. 4 राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील. 5 हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत. 6 भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो. 7 देव आम्हास आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत.
Total 150 अध्याय, Selected धडा 67 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References