1. {सीयोनेचा व पवित्रस्थानाचा परमेश्वर} PS देवाने उठावे; त्याचे वैरी विखरले जावोत;
जे त्याचा तिरस्कार करतात तेही त्याच्यापुढून पळून जावोत. |
2. जसा धूर पांगला जातो, तसे त्यांना दूर पांगून टाक;
जसे मेण अग्नीपुढे वितळते, तसे दुर्जन देवापुढे नष्ट होवोत. |
4. देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा;
ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून * ढगातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा. |
6. देव एकाकी असलेल्यास कुटुंबात ठेवतो;
तो बंदिवानास गीत गात बाहेर आणतो; पण बंडखोर तृषित प्रदेशात राहतात. |
8. तेव्हा भूमी कापली;
देवाच्या उपस्थितीत आकाशातून पाऊसही पडला, देवाच्या उपस्थितीत, इस्राएलाच्या देवाच्या उपस्थित सीनाय पर्वतदेखील कंपित झाला. |
13. जेव्हा तुम्ही काही लोक मेंढवाड्यामध्ये पडून राहता,
तेव्हा ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मढवलेले आहेत, अशा कबुतरासारखे तुम्ही आहात. |
16. देवाला आपल्या निवासासाठी जो पर्वत आवडला आहे,
त्याच्याकडे हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू हेव्याने का पाहतोस? खरोखर, परमेश्वर त्याच्यावरच सर्वकाळ राहील. |
17. देवाचे रथ वीस हजार आहेत, हजारो हजार आहेत.
जसा सीनाय पर्वतावर पवित्रस्थान, तसा प्रभू त्यांच्यामध्ये आहे. |
18. तू उंचावर चढलास; तू बंदिवानास दूर नेले आहे;
मनुष्याकडून आणि जे तुझ्याविरूद्ध लढले त्यांच्यापासूनही भेटी स्वीकारल्या आहेत, यासाठी की, हे परमेश्वर देवा, तू तेथे रहावे. |
22. परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकांस बाशानापासून परत आणीन,
समुद्राच्या खोल स्थानातून त्यांना परत आणीन. |
23. यासाठी की, तू आपल्या शत्रूला चिरडावे, आपला पाय त्यांच्या रक्तात बुडवा,
आणि तुझ्या शत्रुंकडून तुझ्या कुत्र्यांच्या जिभेस वाटा मिळावा. |
24. हे देवा, त्यांनी तुझ्या मिरवणुका पाहिल्या आहेत,
पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका त्यांनी पाहिल्या आहेत. |
27. तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामीन, कनिष्ठ कुळ,
यहूदाचे अधिपती, व त्याच्याबरोबरचे समुदाय जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत. |
28. तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे;
हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव. |
30. लव्हाळ्यात राहणारे वनपशू,
बैलांचा कळप आणि त्यांचे वासरे ह्यांना धमकाव. जे खंडणीची मागणी करतात त्यांना आपल्या पायाखाली तुडव; जे लढाईची आवड धरतात त्यांना विखरून टाक. |
33. जो पुरातन काळापासून अस्तित्वात आहे तो आकाशांच्या आकांशावर आरूढ होतो;
पाहा, तो आपला आवाज सामर्थ्याने उंचावतो. |
35. हे देवा, तू आपल्या पवित्रस्थानात भयप्रद आहे;
इस्राएलाचा देव आपल्या लोकांस बल आणि सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो. PE |