1. {#1सीयोनेचा व पवित्रस्थानाचा परमेश्वर }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]देवाने उठावे; त्याचे वैरी विखरले जावोत; [QE][QS]जे त्याचा तिरस्कार करतात तेही त्याच्यापुढून पळून जावोत. [QE]
2. [QS]जसा धूर पांगला जातो, तसे त्यांना दूर पांगून टाक; [QE][QS]जसे मेण अग्नीपुढे वितळते, तसे दुर्जन देवापुढे नष्ट होवोत. [QE]
3. [QS]परंतु नीतिमान आनंदित होवोत; ते देवापुढे हर्षभरित होवोत; [QE][QS]ते हर्षोत आणि आनंदी होवोत. [QE]
4. [QS]देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा; [QE][QS]ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून[* ढगातून ] चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; [QE][QS]त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा. [QE]
5. [QS]तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार [† न्यायाधीश ] [QE][QS]असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो. [QE]
6. [QS]देव एकाकी असलेल्यास कुटुंबात ठेवतो; [QE][QS]तो बंदिवानास गीत गात बाहेर आणतो; [QE][QS]पण बंडखोर तृषित प्रदेशात राहतात. [QE]
7. [QS]हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे गेला, [QE][QS]जेव्हा तू रानातून चालत गेलास, [QE]
8. [QS]तेव्हा भूमी कापली; [QE][QS]देवाच्या उपस्थितीत आकाशातून पाऊसही पडला, [QE][QS]देवाच्या उपस्थितीत, इस्राएलाच्या देवाच्या उपस्थित सीनाय पर्वतदेखील कंपित झाला. [QE]
9. [QS]हे देवा, तू विपुल पाऊस पाठवलास; [QE][QS]जेव्हा तुझे वतन शिणलेले होते तेव्हा तू ते बळकट केलेस. [QE]
10. [QS]तुझे लोक त्यामध्ये राहिले; [QE][QS]हे देवा, तू आपल्या चांगुलपणातून गरीबांना दिले. [QE]
11. [QS]परमेश्वराने आज्ञा दिली, [QE][QS]आणि ज्यांनी त्यांना घोषणा केली ते मोठे सैन्य होते. [QE]
12. [QS]सैन्यांचे राजे पळून जातात, ते पळून जातात, [QE][QS]आणि घरी राहणारी स्री लूट वाटून घेते. [QE]
13. [QS]जेव्हा तुम्ही काही लोक मेंढवाड्यामध्ये पडून राहता, [QE][QS]तेव्हा ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मढवलेले आहेत, [QE][QS]अशा कबुतरासारखे तुम्ही आहात. [QE]
14. [QS]तेथे सर्वसमर्थाने राजांना विखरले आहे, [QE][QS]तेव्हा सल्मोनावर बर्फ पडते त्याप्रमाणे झाले. [QE]
15. [QS]हे महान पर्वता, बाशानाच्या पर्वता, [QE][QS]उंच बाशान पर्वत शिखरांचा पर्वत आहे. [QE]
16. [QS]देवाला आपल्या निवासासाठी जो पर्वत आवडला आहे, [QE][QS]त्याच्याकडे हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू हेव्याने का पाहतोस? [QE][QS]खरोखर, परमेश्वर त्याच्यावरच सर्वकाळ राहील. [QE]
17. [QS]देवाचे रथ वीस हजार आहेत, हजारो हजार आहेत. [QE][QS]जसा सीनाय पर्वतावर पवित्रस्थान, तसा प्रभू त्यांच्यामध्ये आहे. [QE]
18. [QS]तू उंचावर चढलास; तू बंदिवानास दूर नेले आहे; [QE][QS]मनुष्याकडून आणि जे तुझ्याविरूद्ध लढले [QE][QS]त्यांच्यापासूनही भेटी स्वीकारल्या आहेत, [QE][QS]यासाठी की, हे परमेश्वर देवा, तू तेथे रहावे. [QE]
19. [QS]प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो, [QE][QS]देव आमचे तारण आहे. [QE]
20. [QS]आमचा देव आम्हास तारणारा देव आहे; [QE][QS]मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे. [QE]
21. [QS]पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल, [QE][QS]जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल. [QE]
22. [QS]परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकांस बाशानापासून परत आणीन, [QE][QS]समुद्राच्या खोल स्थानातून त्यांना परत आणीन. [QE]
23. [QS]यासाठी की, तू आपल्या शत्रूला चिरडावे, आपला पाय त्यांच्या रक्तात बुडवा, [QE][QS]आणि तुझ्या शत्रुंकडून तुझ्या कुत्र्यांच्या जिभेस वाटा मिळावा. [QE]
24. [QS]हे देवा, त्यांनी तुझ्या मिरवणुका पाहिल्या आहेत, [QE][QS]पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका त्यांनी पाहिल्या आहेत. [QE]
25. [QS]गायकपुढे गेले, वाजवणारे मागे चालले आहेत, [QE][QS]आणि मध्ये कुमारी कन्या लहान डफ वाजवत चालल्या आहेत. [QE]
26. [QS]मंडळीत देवाचा धन्यवाद करा; [QE][QS]जे तुम्ही इस्राएलाचे खरे वंशज आहात ते तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. [QE]
27. [QS]तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामीन, कनिष्ठ कुळ, [QE][QS]यहूदाचे अधिपती, व त्याच्याबरोबरचे समुदाय [QE][QS]जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत. [QE]
28. [QS]तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे; [QE][QS]हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव. [QE]
29. [QS]यरूशलेमातील मंदिराकरता, [QE][QS]राजे तुला भेटी आणतील. [QE]
30. [QS]लव्हाळ्यात राहणारे वनपशू, [QE][QS]बैलांचा कळप आणि त्यांचे वासरे ह्यांना धमकाव. [QE][QS]जे खंडणीची मागणी करतात त्यांना आपल्या पायाखाली तुडव; [QE][QS]जे लढाईची आवड धरतात त्यांना विखरून टाक. [QE]
31. [QS]मिसरमधून सरदार येतील; [QE][QS]कूश आपले हात देवाकडे पसरण्याची घाई करील. [QE]
32. [QS]अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाला गीत गा, [QE][QS]परमेश्वराची स्तुतिगीते गा. [QE]
33. [QS]जो पुरातन काळापासून अस्तित्वात आहे तो आकाशांच्या आकांशावर आरूढ होतो; [QE][QS]पाहा, तो आपला आवाज सामर्थ्याने उंचावतो. [QE]
34. [QS]देवाच्या सामर्थ्याचे वर्णन करा; [QE][QS]इस्राएलावर त्याचे वैभव [QE][QS]आणि आकाशात त्याचे बल आहे. [QE]
35. [QS]हे देवा, तू आपल्या पवित्रस्थानात भयप्रद आहे; [QE][QS]इस्राएलाचा देव आपल्या लोकांस बल आणि सामर्थ्य देतो. [QE][QS]देव धन्यवादित असो. [QE]