2. मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही;
मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे. |
3. माझ्या रडण्याने मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे;
माझ्या देवाची वाट पाहता माझे डोळे शिणले आहेत. |
4. विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही अधिक आहेत;
जे अन्यायाने माझे वैरी असून मला कापून काढायला पाहतात ते बलवान आहेत; जे मी चोरले नव्हते, ते मला परत करावे लागले. |
6. हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतिक्षा करतात, त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये.
हे इस्राएलाच्या देवा, जे तुला शोधतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये. |
9. कारण तुझ्या मंदीराविषयीच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे,
आणि तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत. |
10. जेव्हा मी रडलो आणि उपवास करून माझ्या जिवाला शिक्षा केली † मी उपवास करून स्वतःला नम्र केले ,
तेव्हा ते जसे माझ्या स्वतःची निंदा होती. |
13. पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो;
हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे. |
14. मला चिखलातून बाहेर काढ, आणि त्यामध्ये मला बुडू देऊ नकोस;
माझा तिरस्कार करणाऱ्यापासून मला वाचव. खोल पाण्यापासून मला काढ. |
15. पुराच्या पाण्याने मला पूर्ण झाकून टाकू नकोस,
खोल डोह मला न गिळो. खाच आपले तोंड माझ्यावर बंद न करो. |
20. निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे;
माझी कीव करणारा कोणीतरी आहे का हे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हता; मी सांत्वनासाठी पाहिले, पण मला कोणी सापडला नाही. |
22. त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत;
जेव्हा ते सुरक्षित आहेत असा विचार करतील, तो त्यांना सापळा होवो. |
23. त्यांचे डोळे आंधळे होवोत यासाठी की, त्यांना काही दिसू नये;
आणि त्यांची कंबर नेहमी थरथर कापावी असे कर. |
26. कारण ज्याला तू दणका दिला त्याचा ते छळ करतात;
तू ज्यांस जखमी केलेस त्यांच्या वेदनेविषयी ते दुसऱ्याला सांगतात. |
35. कारण देव सियोनेला तारील आणि यहूदाची नगरे पुन्हा बांधील;
लोक तेथे राहतील आणि ते त्यांच्या मालकीचे होईल. |