1. {संकटसमयी केलेली आरोळी} [PS] हे देवा, मला तार; [QBR] कारण पाणी माझ्या गळ्याशी [* जीवाशी] येऊन पोहचले आहे. [QBR]
2. मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही; [QBR] मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे. [QBR]
3. माझ्या रडण्याने मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; [QBR] माझ्या देवाची वाट पाहता माझे डोळे शिणले आहेत. [QBR]
4. विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही अधिक आहेत; [QBR] जे अन्यायाने माझे वैरी असून मला कापून काढायला पाहतात ते बलवान आहेत; [QBR] जे मी चोरले नव्हते, ते मला परत करावे लागले. [QBR]
5. हे देवा, तू माझा मूर्खापणा जाणतो, [QBR] आणि माझी पापे तुझ्यापासून लपली नाहीत. [QBR]
6. हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतिक्षा करतात, त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये. [QBR] हे इस्राएलाच्या देवा, जे तुला शोधतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये. [QBR]
7. कारण तुझ्याकरता मी निंदा सहन केली आहे; [QBR] लाजेने माझे तोंड झाकले आहे. [QBR]
8. मी आपल्या बंधूला परका झालो आहे, [QBR] आपल्या आईच्या मुलांस विदेशी झालो आहे. [QBR]
9. कारण तुझ्या मंदीराविषयीच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे, [QBR] आणि तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत. [QBR]
10. जेव्हा मी रडलो आणि उपवास करून माझ्या जिवाला शिक्षा केली [† मी उपवास करून स्वतःला नम्र केले] , [QBR] तेव्हा ते जसे माझ्या स्वतःची निंदा होती. [QBR]
11. जेव्हा मी गोणपाट आपले वस्र केले, [QBR] तेव्हा मी त्यांना उपहास असा झालो. [QBR]
12. जे नगराच्या वेशीत बसतात; [QBR] ते माझी निंदा करतात; मी मद्यप्यांचा गीत झालो. [QBR]
13. पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो; [QBR] हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे. [QBR]
14. मला चिखलातून बाहेर काढ, आणि त्यामध्ये मला बुडू देऊ नकोस; [QBR] माझा तिरस्कार करणाऱ्यापासून मला वाचव. खोल पाण्यापासून मला काढ. [QBR]
15. पुराच्या पाण्याने मला पूर्ण झाकून टाकू नकोस, [QBR] खोल डोह मला न गिळो. [QBR] खाच आपले तोंड माझ्यावर बंद न करो. [QBR]
16. हे परमेश्वरा, मला उत्तर दे, [QBR] कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे. [QBR]
17. आपल्या सेवकापासून आपले तोंड लपवू नकोस, [QBR] कारण मी क्लेशात आहे; मला त्वरीत उत्तर दे. [QBR]
18. माझ्या जिवाजवळ ये आणि त्यास खंडून घे; [QBR] माझ्या शत्रूंमुळे खंडणी भरून मला सोडव. [QBR]
19. तुला माझी निंदा, माझी लाज आणि माझी अप्रतिष्ठा माहित आहे; [QBR] माझे विरोधक माझ्यापुढे आहेत; [QBR]
20. निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे; [QBR] माझी कीव करणारा कोणीतरी आहे का हे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हता; [QBR] मी सांत्वनासाठी पाहिले, पण मला कोणी सापडला नाही. [QBR]
21. त्यांनी मला खाण्यासाठी विष दिले; [QBR] मला तहान लागली असता आंब दिली [QBR]
22. त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत; [QBR] जेव्हा ते सुरक्षित आहेत असा विचार करतील, तो त्यांना सापळा होवो. [QBR]
23. त्यांचे डोळे आंधळे होवोत यासाठी की, त्यांना काही दिसू नये; [QBR] आणि त्यांची कंबर नेहमी थरथर कापावी असे कर. [QBR]
24. तू त्यांच्यावर आपला संताप ओत, [QBR] आणि तुझ्या संतापाची तीव्रता त्यांना गाठो. [QBR]
25. त्यांची ठिकाणे ओसाड पडो; [QBR] त्यांच्या तंबूत कोणीही न राहो. [QBR]
26. कारण ज्याला तू दणका दिला त्याचा ते छळ करतात; [QBR] तू ज्यांस जखमी केलेस त्यांच्या वेदनेविषयी ते दुसऱ्याला सांगतात. [QBR]
27. ते अन्यायानंतर अन्याय करतात त्यांना दोष लाव; [QBR] तुझ्या न्यायाच्या विजयात त्यांना येऊ देऊ नको. [QBR]
28. जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत, [QBR] आणि नितिमानांबरोबर त्यांची नावे लिहिली न जावोत. [QBR]
29. पण मी गरीब आणि दु:खी आहे; [QBR] हे देवा, तुझे तारण मला उंचावर नेवो. [QBR]
30. मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन, [QBR] आणि धन्यवाद देऊन त्यास उंचाविन. [QBR]
31. ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या, [QBR] किंवा दुभागलेल्या खुराच्या गोऱ्ह्यांपेक्षा परमेश्वरास आवडेल. [QBR]
32. लीनांनी हे पाहिले आहे आणि हर्षित झाले; [QBR] जे देवाचा शोध घेतात त्या तुमचे हृदय जिवंत होवो. [QBR]
33. कारण परमेश्वर गरजवंताचे ऐकतो [QBR] आणि आपल्या बंदिवानांचा तिरस्कार करत नाही. [QBR]
34. आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यामध्ये संचार करणारे [QBR] प्रत्येकगोष्ट त्याची स्तुती करा. [QBR]
35. कारण देव सियोनेला तारील आणि यहूदाची नगरे पुन्हा बांधील; [QBR] लोक तेथे राहतील आणि ते त्यांच्या मालकीचे होईल. [QBR]
36. त्याच्या सेवकाचे वंशजही ते वतन करून घेतील; [QBR] आणि ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते तेथे राहतील. [PE]