1. {#1संकटसमयी केलेली आरोळी }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे देवा, मला तार; [QE][QS]कारण पाणी माझ्या गळ्याशी [* जीवाशी ]येऊन पोहचले आहे. [QE]
2. [QS]मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही; [QE][QS]मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे. [QE]
3. [QS]माझ्या रडण्याने मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; [QE][QS]माझ्या देवाची वाट पाहता माझे डोळे शिणले आहेत. [QE]
4. [QS]विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही अधिक आहेत; [QE][QS]जे अन्यायाने माझे वैरी असून मला कापून काढायला पाहतात ते बलवान आहेत; [QE][QS]जे मी चोरले नव्हते, ते मला परत करावे लागले. [QE]
5. [QS]हे देवा, तू माझा मूर्खापणा जाणतो, [QE][QS]आणि माझी पापे तुझ्यापासून लपली नाहीत. [QE]
6. [QS]हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतिक्षा करतात, त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये. [QE][QS]हे इस्राएलाच्या देवा, जे तुला शोधतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये. [QE]
7. [QS]कारण तुझ्याकरता मी निंदा सहन केली आहे; [QE][QS]लाजेने माझे तोंड झाकले आहे. [QE]
8. [QS]मी आपल्या बंधूला परका झालो आहे, [QE][QS]आपल्या आईच्या मुलांस विदेशी झालो आहे. [QE]
9. [QS]कारण तुझ्या मंदीराविषयीच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे, [QE][QS]आणि तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत. [QE]
10. [QS]जेव्हा मी रडलो आणि उपवास करून माझ्या जिवाला शिक्षा केली[† मी उपवास करून स्वतःला नम्र केले ], [QE][QS]तेव्हा ते जसे माझ्या स्वतःची निंदा होती. [QE]
11. [QS]जेव्हा मी गोणपाट आपले वस्र केले, [QE][QS]तेव्हा मी त्यांना उपहास असा झालो. [QE]
12. [QS]जे नगराच्या वेशीत बसतात; [QE][QS]ते माझी निंदा करतात; मी मद्यप्यांचा गीत झालो. [QE]
13. [QS]पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो; [QE][QS]हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे. [QE]
14. [QS]मला चिखलातून बाहेर काढ, आणि त्यामध्ये मला बुडू देऊ नकोस; [QE][QS]माझा तिरस्कार करणाऱ्यापासून मला वाचव. खोल पाण्यापासून मला काढ. [QE]
15. [QS]पुराच्या पाण्याने मला पूर्ण झाकून टाकू नकोस, [QE][QS]खोल डोह मला न गिळो. [QE][QS]खाच आपले तोंड माझ्यावर बंद न करो. [QE]
16. [QS]हे परमेश्वरा, मला उत्तर दे, [QE][QS]कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे. [QE]
17. [QS]आपल्या सेवकापासून आपले तोंड लपवू नकोस, [QE][QS]कारण मी क्लेशात आहे; मला त्वरीत उत्तर दे. [QE]
18. [QS]माझ्या जिवाजवळ ये आणि त्यास खंडून घे; [QE][QS]माझ्या शत्रूंमुळे खंडणी भरून मला सोडव. [QE]
19. [QS]तुला माझी निंदा, माझी लाज आणि माझी अप्रतिष्ठा माहित आहे; [QE][QS]माझे विरोधक माझ्यापुढे आहेत; [QE]
20. [QS]निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे; [QE][QS]माझी कीव करणारा कोणीतरी आहे का हे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हता; [QE][QS]मी सांत्वनासाठी पाहिले, पण मला कोणी सापडला नाही. [QE]
21. [QS]त्यांनी मला खाण्यासाठी विष दिले; [QE][QS]मला तहान लागली असता आंब दिली [QE]
22. [QS]त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत; [QE][QS]जेव्हा ते सुरक्षित आहेत असा विचार करतील, तो त्यांना सापळा होवो. [QE]
23. [QS]त्यांचे डोळे आंधळे होवोत यासाठी की, त्यांना काही दिसू नये; [QE][QS]आणि त्यांची कंबर नेहमी थरथर कापावी असे कर. [QE]
24. [QS]तू त्यांच्यावर आपला संताप ओत, [QE][QS]आणि तुझ्या संतापाची तीव्रता त्यांना गाठो. [QE]
25. [QS]त्यांची ठिकाणे ओसाड पडो; [QE][QS]त्यांच्या तंबूत कोणीही न राहो. [QE]
26. [QS]कारण ज्याला तू दणका दिला त्याचा ते छळ करतात; [QE][QS]तू ज्यांस जखमी केलेस त्यांच्या वेदनेविषयी ते दुसऱ्याला सांगतात. [QE]
27. [QS]ते अन्यायानंतर अन्याय करतात त्यांना दोष लाव; [QE][QS]तुझ्या न्यायाच्या विजयात त्यांना येऊ देऊ नको. [QE]
28. [QS]जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत, [QE][QS]आणि नितिमानांबरोबर त्यांची नावे लिहिली न जावोत. [QE]
29. [QS]पण मी गरीब आणि दु:खी आहे; [QE][QS]हे देवा, तुझे तारण मला उंचावर नेवो. [QE]
30. [QS]मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन, [QE][QS]आणि धन्यवाद देऊन त्यास उंचाविन. [QE]
31. [QS]ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या, [QE][QS]किंवा दुभागलेल्या खुराच्या गोऱ्ह्यांपेक्षा परमेश्वरास आवडेल. [QE]
32. [QS]लीनांनी हे पाहिले आहे आणि हर्षित झाले; [QE][QS]जे देवाचा शोध घेतात त्या तुमचे हृदय जिवंत होवो. [QE]
33. [QS]कारण परमेश्वर गरजवंताचे ऐकतो [QE][QS]आणि आपल्या बंदिवानांचा तिरस्कार करत नाही. [QE]
34. [QS]आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यामध्ये संचार करणारे [QE][QS]प्रत्येकगोष्ट त्याची स्तुती करा. [QE]
35. [QS]कारण देव सियोनेला तारील आणि यहूदाची नगरे पुन्हा बांधील; [QE][QS]लोक तेथे राहतील आणि ते त्यांच्या मालकीचे होईल. [QE]
36. [QS]त्याच्या सेवकाचे वंशजही ते वतन करून घेतील; [QE][QS]आणि ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते तेथे राहतील. [QE]