मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
स्तोत्रसंहिता
1. {#1आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रार्थना }[PS]*कूश बन्यामिन याच्या बोलण्यावरुन परमेश्वरास गाईलेले दाविदाचे शिग्गायोन. *[PE][QS]हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझ्याठायी आश्रय घेतो! [QE][QS]माझा पाठलाग करणाऱ्यांपासून मला वाचव आणि मला सोडव. [QE]
2. [QS]नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील. [QE][QS]वाचवायला कोणी समर्थ नसणार, म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील. [QE]
3. [QS]परमेश्वरा माझ्या देवा, मी असे काही केले नाही जे शत्रू सांगतात, [QE][QS]माझ्या हाती काही अन्याय नाही. [QE]
4. [QS]माझ्याशी शांतीने राहणाऱ्याचे मी कधीही वाईट केले नाही. [QE][QS]किंवा माझ्याविरोधात जे होते त्यांना इजा केली नाही. [QE]
5. [QS]जर मी खरे सांगत नसेल तर, माझे शत्रू माझ्या जीवाच्या पाठीस लागो आणि त्यास गाठून घेवो. [QE][QS]तो माझा जीव मातीत तुडवो आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवो. [QE]
6. [QS]हे परमेश्वरा, आपल्या क्रोधाने उठ; माझ्या विरोध्यांच्या संतापामुळे उभा राहा, [QE][QS]माझ्यासाठी जागा हो आणि तुझ्या न्यायाचा आदेश जो तू आज्ञापीले आहे तो पूर्णत्वास ने. [QE]
7. [QS]राष्ट्रांची सभा तुझ्याभोवती येवो, [QE][QS]आणि पुन्हा तू त्यांच्यावरती आपले योग्य ठिकाण घे. [QE]
8. [QS]परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करतो, [QE][QS]परमेश्वरा, मला समर्थन दे, आणि माझ्या न्यायीपणाप्रमाणे आणि माझ्या स्वतःच्या सात्त्विकतेप्रमाणे माझा न्याय कर. [QE]
9. [QS]दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत होवो, परंतु धार्मिकाला स्थापित कर. [QE][QS]कारण न्यायी देव हृदय व अंतर्यामे पारखणारा आहे. [QE]
10. [QS]जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे. [QE]
11. [QS]देव न्यायी न्यायाधीश आहे, [QE][QS]असा देव जो प्रतिदिवशी न्यायाने रागावतो. [QE]
12. [QS]जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर, देव त्याच्या तलवारीला धार लावणार [QE][QS]आणि त्याचा धनुष्य युद्धासाठी तयार करणार. [QE]
13. [QS]त्याने आपली प्राणघातक शस्त्रे तयार केली आहेत. [QE][QS]तो आपले अग्नीबान तयार करतो. [QE]
14. [QS]त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत. [QE][QS]जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात. [QE]
15. [QS]त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला, [QE][QS]आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला. [QE]
16. [QS]त्याच्या अपायकारक योजना त्याच्याच डोक्यावर परत येतील, [QE][QS]आणि त्याची हिंसा त्याच्याच माथ्यावर येईल. [QE]
17. [QS]मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन, [QE][QS]मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 7 / 150
आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रार्थना 1 कूश बन्यामिन याच्या बोलण्यावरुन परमेश्वरास गाईलेले दाविदाचे शिग्गायोन. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझ्याठायी आश्रय घेतो! माझा पाठलाग करणाऱ्यांपासून मला वाचव आणि मला सोडव. 2 नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील. वाचवायला कोणी समर्थ नसणार, म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील. 3 परमेश्वरा माझ्या देवा, मी असे काही केले नाही जे शत्रू सांगतात, माझ्या हाती काही अन्याय नाही. 4 माझ्याशी शांतीने राहणाऱ्याचे मी कधीही वाईट केले नाही. किंवा माझ्याविरोधात जे होते त्यांना इजा केली नाही. 5 जर मी खरे सांगत नसेल तर, माझे शत्रू माझ्या जीवाच्या पाठीस लागो आणि त्यास गाठून घेवो. तो माझा जीव मातीत तुडवो आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवो. 6 हे परमेश्वरा, आपल्या क्रोधाने उठ; माझ्या विरोध्यांच्या संतापामुळे उभा राहा, माझ्यासाठी जागा हो आणि तुझ्या न्यायाचा आदेश जो तू आज्ञापीले आहे तो पूर्णत्वास ने. 7 राष्ट्रांची सभा तुझ्याभोवती येवो, आणि पुन्हा तू त्यांच्यावरती आपले योग्य ठिकाण घे. 8 परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करतो, परमेश्वरा, मला समर्थन दे, आणि माझ्या न्यायीपणाप्रमाणे आणि माझ्या स्वतःच्या सात्त्विकतेप्रमाणे माझा न्याय कर. 9 दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत होवो, परंतु धार्मिकाला स्थापित कर. कारण न्यायी देव हृदय व अंतर्यामे पारखणारा आहे. 10 जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे. 11 देव न्यायी न्यायाधीश आहे, असा देव जो प्रतिदिवशी न्यायाने रागावतो. 12 जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर, देव त्याच्या तलवारीला धार लावणार आणि त्याचा धनुष्य युद्धासाठी तयार करणार. 13 त्याने आपली प्राणघातक शस्त्रे तयार केली आहेत. तो आपले अग्नीबान तयार करतो. 14 त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत. जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात. 15 त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला, आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला. 16 त्याच्या अपायकारक योजना त्याच्याच डोक्यावर परत येतील, आणि त्याची हिंसा त्याच्याच माथ्यावर येईल. 17 मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन, मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन.
Total 150 अध्याय, Selected धडा 7 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References