1. {#1वृद्धाची प्रार्थना } [QS]हे परमेश्वरा, मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; [QE][QS]मला कधीही लज्जित होऊ देऊ नको. [QE]
2. [QS]मला सोडव आणि तुझ्या न्यायीपणात मला सुरक्षित ठेव; [QE][QS]तू आपला कान मजकडे लाव आणि माझे तारण कर. [QE]
3. [QS]मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो; [QE][QS]तू मला तारावयास आज्ञा दिली आहे, [QE][QS]कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस. [QE]
4. [QS]हे माझ्या देवा, तू मला दुष्टांच्या हातातून वाचव, [QE][QS]अन्यायी आणि निष्ठूर मनुष्याच्या हातातून मला वाचव. [QE]
5. [QS]कारण हे प्रभू, तू माझी आशा आहेस. [QE][QS]मी लहान मूल होतो तेव्हापासूनच तू माझा भरवसा आहे. [QE]
6. [QS]गर्भापासून तूच माझा आधार आहेस; [QE][QS]माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले; [QE][QS]माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल. [QE]
7. [QS]पुष्कळ लोकांस मी कित्ता झालो आहे; [QE][QS]तू माझा बळकट आश्रय आहे. [QE]
8. [QS]माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने [QE][QS]आणि सन्मानाने भरलेले असो. [QE]
9. [QS]माझ्या वृद्धापकाळात मला दूर फेकून देऊ नको; [QE][QS]जेव्हा माझी शक्ती कमी होईल तेव्हा मला सोडू नकोस. [QE]
10. [QS]कारण माझे शत्रू माझ्याविरूद्ध बोलत आहेत; [QE][QS]जे माझ्या जिवावर पाळत ठेवून आहेत ते एकत्रित येऊन कट करत आहेत. [QE]
11. [QS]ते म्हणाले देवाने त्यास सोडले आहे; [QE][QS]त्याचा पाठलाग करा आणि त्यास घ्या, कारण त्यास सोडवणारा कोणीही नाही. [QE]
12. [QS]हे देवा, तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस; [QE][QS]माझ्या देवा, माझ्या मदतीला त्वरा कर! [QE]
13. [QS]जे माझ्या जिवाचे विरोधी आहेत त्यांना लज्जित आणि नष्ट कर, [QE][QS]जे माझे अनिष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना धिक्काराने आणि मानहानीने झाकून टाक. [QE]
14. [QS]पण मी तुझ्यात नेहमीच आशा धरून राहीन, [QE][QS]आणि तुझी जास्तीत जास्त स्तुती करीत जाईन. [QE]
15. [QS]माझे मुख तुझ्या न्यायीपणाचे [QE][QS]आणि तारणाविषयी सांगत राहील, [QE][QS]जरी मला ते समजले नाही. [QE]
16. [QS]प्रभू परमेश्वराच्या सामर्थ्यी कृत्याबरोबर मी त्यांच्याकडे जाईन; [QE][QS]मी तुझ्या, केवळ तुझ्याच, नितिमत्वाचा उल्लेख करीन. [QE]
17. [QS]हे देवा, तू माझ्या तरुणपणापासून मला शिकवीत आला आहेस; [QE][QS]आतासुद्धा तुझी आश्चर्यजनक कृत्ये सांगत आहे. [QE]
18. [QS]खरोखर, जेव्हा आता मी म्हातारा आणि केस पिकलेला झालो आहे, [QE][QS]तेव्हा पुढल्या पिढीला तुझे सामर्थ्य, येणाऱ्या प्रत्येकाला तुझा पराक्रम मी सांगेपर्यंत, [QE][QS]हे देवा, मला सोडू नको. [QE]
19. [QS]हे देवा, तुझे नितिमत्व खूप उंच आहे; [QE][QS]हे देवा, ज्या तू महान गोष्टी केल्या आहेस, त्या तुझ्यासारखा कोण आहे? [QE]
20. [QS]ज्या तू मला अनेक भयंकर संकटे दाखवली, [QE][QS]तो तू मला पुन्हा जिवंत करशील; [QE][QS]आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील. [QE]
21. [QS]तू माझा सन्मान वाढव; [QE][QS]आणि पुन्हा वळून माझे सांत्वन कर. [QE]
22. [QS]मी सतारीवरही तुला धन्यवाद देईन, [QE][QS]हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; [QE][QS]हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, [QE][QS]मी वीणेवर तुझी स्रोत्रे गाईन. [QE]
23. [QS]मी तुझी स्तवने गाताना माझे ओठ हर्षाने [QE][QS]आणि जो माझा जीव तू खंडून घेतला तोही जल्लोष करील. [QE]
24. [QS]माझी जीभदेखील दिवसभर तुझ्या नितिमत्वाविषयी बोलेल; [QE][QS]कारण ज्यांनी मला इजा करण्याचा प्रयत्न केला ते लज्जित झाले आहेत, आणि गोंधळून गेले आहेत. [QE]