1. {वृद्धाची प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; [QBR] मला कधीही लज्जित होऊ देऊ नको. [QBR]
2. मला सोडव आणि तुझ्या न्यायीपणात मला सुरक्षित ठेव; [QBR] तू आपला कान मजकडे लाव आणि माझे तारण कर. [QBR]
3. मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो; [QBR] तू मला तारावयास आज्ञा दिली आहे, [QBR] कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस. [QBR]
4. हे माझ्या देवा, तू मला दुष्टांच्या हातातून वाचव, [QBR] अन्यायी आणि निष्ठूर मनुष्याच्या हातातून मला वाचव. [QBR]
5. कारण हे प्रभू, तू माझी आशा आहेस. [QBR] मी लहान मूल होतो तेव्हापासूनच तू माझा भरवसा आहे. [QBR]
6. गर्भापासून तूच माझा आधार आहेस; [QBR] माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले; [QBR] माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल. [QBR]
7. पुष्कळ लोकांस मी कित्ता झालो आहे; [QBR] तू माझा बळकट आश्रय आहे. [QBR]
8. माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने [QBR] आणि सन्मानाने भरलेले असो. [QBR]
9. माझ्या वृद्धापकाळात मला दूर फेकून देऊ नको; [QBR] जेव्हा माझी शक्ती कमी होईल तेव्हा मला सोडू नकोस. [QBR]
10. कारण माझे शत्रू माझ्याविरूद्ध बोलत आहेत; [QBR] जे माझ्या जिवावर पाळत ठेवून आहेत ते एकत्रित येऊन कट करत आहेत. [QBR]
11. ते म्हणाले देवाने त्यास सोडले आहे; [QBR] त्याचा पाठलाग करा आणि त्यास घ्या, कारण त्यास सोडवणारा कोणीही नाही. [QBR]
12. हे देवा, तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस; [QBR] माझ्या देवा, माझ्या मदतीला त्वरा कर! [QBR]
13. जे माझ्या जिवाचे विरोधी आहेत त्यांना लज्जित आणि नष्ट कर, [QBR] जे माझे अनिष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना धिक्काराने आणि मानहानीने झाकून टाक. [QBR]
14. पण मी तुझ्यात नेहमीच आशा धरून राहीन, [QBR] आणि तुझी जास्तीत जास्त स्तुती करीत जाईन. [QBR]
15. माझे मुख तुझ्या न्यायीपणाचे [QBR] आणि तारणाविषयी सांगत राहील, [QBR] जरी मला ते समजले नाही. [QBR]
16. प्रभू परमेश्वराच्या सामर्थ्यी कृत्याबरोबर मी त्यांच्याकडे जाईन; [QBR] मी तुझ्या, केवळ तुझ्याच, नितिमत्वाचा उल्लेख करीन. [QBR]
17. हे देवा, तू माझ्या तरुणपणापासून मला शिकवीत आला आहेस; [QBR] आतासुद्धा तुझी आश्चर्यजनक कृत्ये सांगत आहे. [QBR]
18. खरोखर, जेव्हा आता मी म्हातारा आणि केस पिकलेला झालो आहे, [QBR] तेव्हा पुढल्या पिढीला तुझे सामर्थ्य, येणाऱ्या प्रत्येकाला तुझा पराक्रम मी सांगेपर्यंत, [QBR] हे देवा, मला सोडू नको. [QBR]
19. हे देवा, तुझे नितिमत्व खूप उंच आहे; [QBR] हे देवा, ज्या तू महान गोष्टी केल्या आहेस, त्या तुझ्यासारखा कोण आहे? [QBR]
20. ज्या तू मला अनेक भयंकर संकटे दाखवली, [QBR] तो तू मला पुन्हा जिवंत करशील; [QBR] आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील. [QBR]
21. तू माझा सन्मान वाढव; [QBR] आणि पुन्हा वळून माझे सांत्वन कर. [QBR]
22. मी सतारीवरही तुला धन्यवाद देईन, [QBR] हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; [QBR] हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, [QBR] मी वीणेवर तुझी स्रोत्रे गाईन. [QBR]
23. मी तुझी स्तवने गाताना माझे ओठ हर्षाने [QBR] आणि जो माझा जीव तू खंडून घेतला तोही जल्लोष करील. [QBR]
24. माझी जीभदेखील दिवसभर तुझ्या नितिमत्वाविषयी बोलेल; [QBR] कारण ज्यांनी मला इजा करण्याचा प्रयत्न केला ते लज्जित झाले आहेत, आणि गोंधळून गेले आहेत. [PE]