1. {#1शत्रूचा शेवट }[PS]*आसाफाचे स्तोत्र *[PE][QS]खात्रीने देव इस्राएलास चांगला आहे, [QE][QS]जे अंतःकरणाने शुद्ध आहेत. [QE]
2. [QS]पण माझ्यासाठी जसे माझे पाय बहुतेक निसटणार होते; [QE][QS]माझे पाय बहुतेक माझ्या खालून निसटणार होते. [QE]
3. [QS]कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला [QE][QS]तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला. [QE]
4. [QS]कारण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना वेदना होत नाही, [QE][QS]पण ते बलवान आणि चांगले पुष्ट असतात. [QE]
5. [QS]दुसऱ्या मनुष्याच्या भारापासून मुक्त असतात; [QE][QS]ते दुसऱ्या मनुष्यासारखे जुलूमात नसतात. [QE]
6. [QS]अभिमानाने ते त्यांच्या गळ्याभोवती असलेल्या हाराप्रमाणे आपल्याला सुशोभित करतात; [QE][QS]झग्यासारखा ते हिंसाचाराचे वस्र घालतात. [QE]
7. [QS]अंधत्वातून असे पाप बाहेर येते; [QE][QS]वाईट विचार त्यांच्या अंतःकरणातून निघतात. [QE]
8. [QS]ते माझी चेष्टा करून वाईट गोष्टी बोलतात; [QE][QS]ते गर्वाने हिंसाचाराची धमकी देतात. [QE]
9. [QS]ते आकाशाविरूद्ध बोलतात, [QE][QS]आणि त्यांची जीभ पृथ्वीतून भटकते. [QE]
10. [QS]म्हणून देवाचे लोक त्यांच्याकडे वळतात [QE][QS]आणि त्यांच्या वचनातले पाणी भरपूर पितात. [QE]
11. [QS]ते म्हणतात, “देवाला हे कसे माहित होणार? [QE][QS]काय चालले आहे ते देवाला कसे कळते?” [QE]
12. [QS]पाहा हे लक्षात घ्या, हे लोक दुष्ट आहेत; [QE][QS]ते नेहमी चिंतामुक्त असून धनवान झाले आहेत. [QE]
13. [QS]खचित मी आपले हृदय जपले, [QE][QS]आणि आपले हात निरागसतेत धुतले हे व्यर्थ आहे. [QE]
14. [QS]कारण दिवसभर मी पीडला जातो [QE][QS]आणि प्रत्येक सकाळी शिक्षा होते. [QE]
15. [QS]जर मी म्हणालो असतो की, मी या गोष्टी बोलेन, [QE][QS]तर मी या पिढीच्या तुझ्या मुलांचा विश्वासघात केला असता. [QE]
16. [QS]तरी या गोष्टी मी समजण्याचा प्रयत्न केला, [QE][QS]पण त्या माझ्यासाठी खूप कठीण होत्या. [QE]
17. [QS]मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो, [QE][QS]आणि नंतर त्यांच्या भवितव्याचा शेवट मला समजून आला. [QE]
18. [QS]खचित तू त्यांना निसरड्या जागी ठेवतो; [QE][QS]त्यांना तू खाली नाशात पाडतोस. [QE]
19. [QS]कसे अचानक ते उध्वस्त झाले. [QE][QS]आणि भयानक दहशतीत ते संपूर्ण नष्ट झाले. [QE]
20. [QS]जागा झालेल्या मनुष्यास जसे स्वप्न निरर्थक वाटते; [QE][QS]तसे हे प्रभू, जेव्हा तू जागा होशील, तेव्हा त्यांचे ते स्वप्न तुच्छ मानशील. [QE]
21. [QS]कारण माझे हृदय दुःखीत झाले होते, [QE][QS]आणि मी खोलवर घायाळ झालो. [QE]
22. [QS]मी अज्ञानी होतो आणि सूक्ष्मदृष्टीची उणीव होती; [QE][QS]मी तुझ्यापुढे मूर्ख प्राण्यासारखा होतो. [QE]
23. [QS]तरी मी तुझ्याबरोबर नेहमी आहे; [QE][QS]तू माझा उजवा हात धरला आहे. [QE]
24. [QS]तू आपल्या उपदेशाने मला मार्ग दाखवशील [QE][QS]आणि त्यानंतर तू मला गौरवात स्वीकारशील. [QE]
25. [QS]स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? [QE][QS]पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय कोणी प्रिय नाही? [QE]
26. [QS]माझा देह आणि माझे हृदय दुर्बल होत आहेत, [QE][QS]पण देव सर्वकाळ माझ्या हृदयाचे सामर्थ्य [* सामर्थ्य ]आहे. [QE]
27. [QS]जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; [QE][QS]जे तुझ्याशी अविश्वासू आहेत त्या सर्वांचा तू नाश करशील. [QE]
28. [QS]पण माझ्याविषयी म्हटले, तर देवाजवळ जाणे यामध्येच माझे कल्याण आहे. [QE][QS]मी प्रभू परमेश्वरास आपले आश्रयस्थान केले आहे. [QE][QS]मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करीन. [QE]