1. {#1विजयी व न्यायी देव }[PS]*मुख्य संगीतकारासाठी, तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्तोत्र गीत. *[PE][QS]यहूदात देव कळाला आहे, [QE][QS]इस्राएलामध्ये त्याचे नाव थोर आहे. [QE]
2. [QS]शालेममध्ये [* यरूशलेम ]त्याचा मंडप आहे, [QE][QS]आणि सियोनेत त्याची गुहा आहे. [QE]
3. [QS]तेथे त्याने धनुष्य बाण, ढाली, तलवारी [QE][QS]आणि इतर शस्त्रे मोडून टाकली आहेत. [QE]
4. [QS]तू जेथे शत्रूंना ठार केलेस, [QE][QS]त्या डोंगरावरून उतरताना तू तेजस्वी चमकतोस आणि तुझे वैभव प्रकट करतोस. [QE]
5. [QS]जे हृदयाचे धाडसी ते लुटले गेले आहेत, [QE][QS]ते झोपी गेले आहेत, [QE][QS]सर्व योद्धे असहाय्य झाले आहेत. [QE]
6. [QS]हे याकोबाच्या देवा, तुझ्या युद्धाच्या आरोळीने, [QE][QS]रथ आणि घोडे दोन्हीपण झोपी गेलेत आहेत. [QE]
7. [QS]तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस. [QE][QS]असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील? [QE]
8. [QS]तुझा न्याय आकाशातून आला, [QE][QS]आणि पृथ्वी भयभित व नि:शब्द झाली. [QE]
9. [QS]देवा, तू, पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारायला, [QE][QS]न्याय अमलांत आणण्यास उठला आहे. [QE]
10. [QS]खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल. [QE][QS]तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे. [QE]
11. [QS]परमेश्वर तुमच्या देवाला नवस करून फेडा, [QE][QS]ज्याचे भय धरणे योग्य आहे, जे तुम्ही त्याच्या सभोवती आहात, त्यास भेटी आणा. [QE]
12. [QS]तो अधिकाऱ्यांच्या आत्म्याला नम्र करतो. [QE][QS]पृथ्वीच्या राजांना तो भयावह असा आहे. [QE]