1. {#1देवाच्या महत्कृत्यांच्या स्मरणाने समाधान }[PS]*आसाफाचे स्तोत्र *[PE][QS]मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; [QE][QS]मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन आणि माझा देव माझे ऐकेल. [QE]
2. [QS]माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभूला शोधले. [QE][QS]मी रात्रभर हात पसरून प्रार्थना केली; तो ढिला पडला नाही. [QE][QS]माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले. [QE]
3. [QS]मी देवाचा विचार करतो तसा मी कण्हतो; [QE][QS]मी त्याबद्दल चिंतन करतो तसा मी क्षीण होतो. [QE]
4. [QS]तू माझे डोळे उघडे ठेवतोस; [QE][QS]मी इतका व्याकुळ झालो की, माझ्याने बोलवत नाही. [QE]
5. [QS]मी पूर्वीचे दिवस व पुरातन काळची वर्षे [QE][QS]याबद्दल मी विचार करतो. [QE]
6. [QS]रात्रीत मी एकदा गाईलेल्या गाण्याची मला आठवण येते. [QE][QS]मी काळजीपूर्वक विचार करतो [QE][QS]आणि काय घडले हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. [QE]
7. [QS]प्रभू सर्वकाळ आमचा नकार करील काय? [QE][QS]तो मला पुन्हा कधीच प्रसन्नता दाखवणार नाही का? [QE]
8. [QS]त्याच्या विश्वासाचा करार कायमचा गेला आहे का? [QE][QS]त्याची अभिवचने पिढ्यानपिढ्या अयशस्वी होतील का? [QE]
9. [QS]देव दया करण्याचे विसरला का? [QE][QS]त्याच्या रागाने त्याचा कळवळा बंद केला आहे का? [QE]
10. [QS]मी म्हणालो, हे माझे दुःख आहे, [QE][QS]आमच्या प्रती परात्पराचा उजवा हात बदलला आहे [QE]
11. [QS]पण मी परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन; [QE][QS]मी तुझ्या पुरातन काळच्या आश्चर्यकारक कृत्यांविषयी विचार करीन. [QE]
12. [QS]मी तुझ्या सर्व कृत्यावर चिंतन करीन, [QE][QS]आणि मी त्यावर काळजीपूर्वक विचार करीन. [QE]
13. [QS]हे देवा, तुझे मार्ग पवित्र [* चमत्कारीक ]आहेत, [QE][QS]आमच्या महान देवाशी कोणता देव तुलना करेल. [QE]
14. [QS]अद्भुत कृत्ये करणारा देव तूच आहेस. [QE][QS]तू लोकांमध्ये आपले सामर्थ्य उघड केले आहे. [QE]
15. [QS]याकोब आणि योसेफ यांच्या वंशजाना, [QE][QS]आपल्या लोकांस आपल्या सामर्थ्याने विजय दिला आहेस. [QE]
16. [QS]हे देवा, जलाने तुला पाहिले, [QE][QS]जलांनी तुला पाहिले आणि ते घाबरले, [QE][QS]खोल जले कंपित झाली. [QE]
17. [QS]मेघांनी पाणी खाली ओतले; [QE][QS]आभाळ गडगडाटले; [QE][QS]तुझे बाणही चमकू लागले. [QE]
18. [QS]तुझ्या गर्जनेची वाणी वावटळित ऐकण्यात आली; [QE][QS]विजांनी जग प्रकाशमय केले; [QE][QS]पृथ्वी कंपित झाली आणि थरथरली. [QE]
19. [QS]समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, [QE][QS]पण तुझ्या पावलाचे ठसे कोठेही दिसले नाहीत. [QE]
20. [QS]मोशे आणि अहरोन याच्या हाताने [QE][QS]तू आपल्या लोकांस कळपाप्रमाणे नेलेस. [QE]