1. {#1एकनिष्ठपणे न वागणाऱ्यावरही देवाची कृपा }[PS]*आसाफाचे स्तोत्र *[PE][QS]अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका, [QE][QS]माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या. [QE]
2. [QS]मी शहाणपणाचे गीत गाईन; [QE][QS]मी पूर्वकाळच्या गुप्त गोष्टीबद्दल सांगेन. [QE]
3. [QS]ज्या आम्ही ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या, [QE][QS]त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या. [QE]
4. [QS]त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही. [QE][QS]त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, [QE][QS]त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू. [QE]
5. [QS]कारण त्याने याकोबात निर्बंध स्थापले [QE][QS]आणि इस्राएलासाठी नियमशास्त्र नेमले. [QE][QS]त्याने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या की, [QE][QS]त्यांनी त्या आपल्या मुलांना शिकवाव्या. [QE]
6. [QS]त्याने ही आज्ञा यासाठी दिली की, पुढच्या पिढीने म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्यांनी त्या आज्ञा जाणाव्या, [QE][QS]त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या. [QE]
7. [QS]मग ते आपली आशा देवावर ठेवतील [QE][QS]आणि त्याची कृत्ये विसरणार नाहीत [QE][QS]परंतु त्याच्या आज्ञा पाळतील. [QE]
8. [QS]तर त्यांनी आपल्या पूर्वजासारखे [QE][QS]हट्टी आणि बंडखोर पिढी होऊ नये, [QE][QS]त्यांनी आपले अंतःकरण योग्य राखले नाही, [QE][QS]आणि जिचा आत्मा देवाला समर्पित व प्रामाणिक नव्हता. [QE]
9. [QS]एफ्राइमाचे वंशज धनुष्यासह सशस्र होती, [QE][QS]परंतु त्यांनी युद्धाच्यादिवशी पाठ फिरवली. [QE]
10. [QS]त्यांनी देवाबरोबर करार पाळला नाही, [QE][QS]आणि त्यांनी त्याचे नियमशास्त्र पाळण्याचे नाकारले. [QE]
11. [QS]ते त्याची कृत्ये [QE][QS]व त्याने दाखवलेली विस्मयकारक गोष्टी ते विसरले. [QE]
12. [QS]मिसर देशातल्या सोअन प्रांतात [QE][QS]त्यांच्या वडिलांच्या दृष्टीसमोर त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या. [QE]
13. [QS]त्याने समुद्र दुभागला आणि त्यांना पलिकडे नेले, [QE][QS]त्याने पाणी भिंतीसारखे उभे केले. [QE]
14. [QS]तो त्यांना दिवसा मेघ [QE][QS]व रात्रभर अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवित घेऊन जात असे. [QE]
15. [QS]त्याने रानात खडक फोडला, [QE][QS]आणि समुद्राची खोली पुरे भरण्यापर्यंत त्यांना विपुल पाणी दिले. [QE]
16. [QS]त्याने खडकातून पाण्याचे प्रवाह [QE][QS]आणि नदीसारखे पाणी बाहेर वाहविले. [QE]
17. [QS]तरी ते त्याच्याविरुध्द पाप करितच राहिले. [QE][QS]रानात परात्पराविरूद्ध बंड केले. [QE]
18. [QS]नंतर त्यांनी आपली भूक तृप्त करण्यासाठी, [QE][QS]अन्न मागून आपल्या मनात देवाला आव्हान दिले. [QE]
19. [QS]ते देवाविरूद्ध बोलले, [QE][QS]ते म्हणाले, “देव खरोखर आम्हास रानात भोजन देऊ शकेल का? [QE]
20. [QS]पहा, त्याने खडकावर प्रहार केला तेव्हा पाणी उसळून बाहेर पडले, [QE][QS]आणि पाण्याचे प्रवाह भरून वाहू लागले. [QE][QS]पण भाकरही देऊ शकेल काय? [QE][QS]तो आपल्या लोकांसाठी मांसाचा पुरवठा करील काय?” [QE]
21. [QS]जेव्हा परमेश्वराने हे ऐकले, तेव्हा तो रागावला; [QE][QS]म्हणून याकोबावर त्याचा अग्नि भडकला, [QE][QS]आणि त्याच्या रागाने इस्राएलवर हल्ला केला, [QE]
22. [QS]कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही, [QE][QS]आणि त्याच्या तारणावर भरवसा ठेवला नाही. [QE]
23. [QS]तरी त्याने वर आभाळाला आज्ञा दिली, [QE][QS]आणि आभाळाचे दरवाजे उघडले. [QE]
24. [QS]खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्नाचा वर्षाव केला, [QE][QS]आणि त्यांना आकाशातून धान्य दिले. [QE]
25. [QS]देवदूतांची भाकर लोकांनी खाल्ली. [QE][QS]त्याने त्यांना भरपूर अन्न पाठवून दिले. [QE]
26. [QS]त्याने आकाशात पूर्वेचा वारा वाहविला, [QE][QS]आणि त्याच्या सामर्थ्याने त्याने दक्षिणेच्या वाऱ्याला मार्ग दाखवला. [QE]
27. [QS]त्याने त्यांच्यावर धुळीप्रमाणे मांसाचा [QE][QS]आणि समुद्रातील वाळूप्रमाणे असंख्य पक्षांचा वर्षाव केला. [QE]
28. [QS]ते त्यांच्या छावणीच्यामध्ये पडले, [QE][QS]त्यांच्या तंबूच्या सर्व सभोवती पडले. [QE]
29. [QS]मग त्यांनी ते खाल्ले आणि तृप्त झाले. त्यांच्या हावेप्रमाणे त्याने त्यांना दिले. [QE]
30. [QS]पण अजून त्यांची तृप्ती झाली नव्हती; [QE][QS]त्यांचे अन्न त्यांच्या तोडांतच होते. [QE]
31. [QS]त्याच क्षणाला, देवाच्या कोपाने त्याच्यावर हल्ला केला, [QE][QS]आणि त्यांच्यातील बलवानास मारून टाकले. [QE][QS]त्याने इस्राएलाच्या तरुणास हाणून पाडले. [QE]
32. [QS]इतके झाले तरी ते पाप करितच राहीले, [QE][QS]आणि त्यांनी त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांवर विश्वास ठेवला नाही. [QE]
33. [QS]म्हणून देवाने त्यांचे दिवस थोडके केले; [QE][QS]त्यांचे आयुष्य भयानक भयात संपवले. [QE]
34. [QS]जेव्हा कधी देवाने त्यांना पीडिले, तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. [QE][QS]उत्सुकतेने ते त्याच्याकडे वळले. [QE]
35. [QS]देव आमचा खडक आहे, [QE][QS]आणि परात्पर देव आमचा सोडवणारा याची आठवण त्यांना झाली. [QE]
36. [QS]पण त्यांनी आपल्या मुखाने त्याची खोटी स्तुती केली [QE][QS]आणि आपल्या जीभेने त्याच्याजवळ लबाडी केली. [QE]
37. [QS]कारण त्यांचे मन त्यांच्याठायी स्थिर नव्हते, [QE][QS]आणि ते त्याच्या कराराशी एकनिष्ठ नव्हते. [QE]
38. [QS]परंतु तो दयाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि त्याने त्यांचा नाश केला नाही. [QE][QS]होय, तो अनेक वेळा आपला राग आवरून धरतो, [QE][QS]आणि आपला सर्व राग भडकू देत नाही. [QE]
39. [QS]ती केवळ देह आहेत, [QE][QS]वारा वाहून निघून जातो आणि तो परत येत नाही याची त्याने आठवण केली. [QE]
40. [QS]त्यांनी किती वेळा रानात त्याच्याविरुध्द बंडखोरी केली, [QE][QS]आणि पडिक प्रदेशात त्यांनी त्यास दु:खी केले. [QE]
41. [QS]पुन्हा आणि पुन्हा देवाला आव्हान केले, [QE][QS]आणि इस्राएलाच्या पवित्र प्रभूला खूप दु:खविले. [QE]
42. [QS]त्यांनी त्याच्या सामर्थ्याविषयी विचार केला नाही, [QE][QS]त्याने त्यांना शत्रूपासून कसे सोडवले होते. [QE]
43. [QS]मिसरात जेव्हा त्याने आपली घाबरून सोडणारी चिन्हे [QE][QS]आणि सोअनाच्या प्रांतात आपले चमत्कारही दाखविले ते विसरले. [QE]
44. [QS]त्याने मिसऱ्यांच्या नद्यांचे रक्तात रुपांतर केले. [QE][QS]म्हणून त्याच्या प्रवाहातील पाणी त्यांच्याने पिववेना. [QE]
45. [QS]त्याने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले त्यांनी त्यांना खाऊन टाकले, [QE][QS]आणि बेडकांनी त्यांचा देश आच्छादला. [QE]
46. [QS]त्याने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली [QE][QS]आणि त्यांच्या श्रमाचे फळ टोळाला दिले. [QE]
47. [QS]त्याने गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा [QE][QS]आणि त्यांच्या उंबराच्या झाडांचा नाश बर्फाने केला. [QE]
48. [QS]त्याने त्यांची गुरेढोरे गारांच्या [QE][QS]व त्यांचे कळप विजांच्या हवाली केली. [QE]
49. [QS]त्यांने आपल्या भयंकर रागाने त्यांच्याविरुद्ध तडाखे दिले. [QE][QS]त्याने अरिष्ट आणणाऱ्या प्रतिनीधीप्रमाणे आपला क्रोध, प्रकोप आणि संकट पाठवले. [QE]
50. [QS]त्याने आपल्या रागासाठी मार्ग सपाट केला; [QE][QS]त्याने त्यांना मरणापासून वाचविले नाही [QE][QS]पण त्याने त्यांना मरीच्या हवाली केले. [QE]
51. [QS]त्याने मिसरमध्ये प्रथम जन्मलेले सर्व, [QE][QS]हामाच्या तंबूतील[* हामचे तंबू हा मिसरबद्दल बोलण्याचा एक मार्ग आहे (105:23, 27; 106:22 पहा, जिथे मिसरला “हामची भूमी असे म्हटले आहे”). हाम हा नोहाच्या मुलांपैकी एक होता, आणि त्याला मिसरी लोकांचा पूर्वज म्हटले गेले (उत्पत्ती 10:6 पहा). ] त्यांच्या शक्तीचे प्रथम जन्मलेले मारून टाकले. [QE]
52. [QS]त्याने आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर नेले [QE][QS]आणि त्याने त्याच्या कळपाप्रमाणे रानातून नेले. [QE]
53. [QS]त्याने त्यांना सुखरुप आणि न भीता मार्गदर्शन केले, [QE][QS]पण समुद्राने त्यांच्या शत्रूंना बुडवून टाकले. [QE]
54. [QS]आणि त्याने त्यास आपल्या पवित्र देशात, [QE][QS]हा जो पर्वत आपल्या उजव्या हाताने मिळवला त्याकडे आणले. [QE]
55. [QS]त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रांना हाकलून लावली, [QE][QS]आणि त्यांना त्यांची वतने सूत्राने मापून नेमून दिली; आणि त्यांच्या तंबूत इस्राएलाचे वंश वसविले. [QE]
56. [QS]तरी त्यांनी परात्पर देवाला आव्हान दिले आणि त्याच्याविरुध्द बंडखोरी केली, [QE][QS]आणि त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. [QE]
57. [QS]ते आपल्या पूर्वजाप्रमाणे अविश्वासू होते आणि त्यांनी विश्वासघातकी कृत्ये केली; [QE][QS]फसव्या धनुष्याप्रमाणे ते स्वतंत्रपणे वळणारे होते. [QE]
58. [QS]कारण त्यांनी आपल्या उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले [QE][QS]आणि आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्यास आवेशाने कोपविले. [QE]
59. [QS]जेव्हा देवाने हे ऐकले, तो रागावला, [QE][QS]आणि त्याने इस्राएलाला पूर्णपणे झिडकारले. [QE]
60. [QS]त्याने शिलोतले [† शिलो हे शहर एफ्राइमाच्या कुळाचा प्रदेश होते, जेथे इस्राएलाच्या इतिहासाच्या सुरवातीच्या दिवसात कराराचा कोश ठेवण्यात आला होता (यहो. 18:1; 1 शमु. 1:3 पहा). ]पवित्रस्थान सोडून दिले, [QE][QS]ज्या तंबूत लोकांच्यामध्ये तो राहत होता. [QE]
61. [QS]त्याने आपल्या सामर्थ्याचा कोश बंदिवासात जाण्याची परवानगी दिली, [QE][QS]आणि आपले गौरव शत्रूच्या हातात दिले. [QE]
62. [QS]त्याने आपले लोक तलवारीच्या स्वाधीन केले, [QE][QS]आणि आपल्या वतनावर तो रागावला. [QE]
63. [QS]अग्नीने त्यांच्या तरुण मनुष्यास खाऊन टाकले, [QE][QS]आणि त्यांच्या तरुण स्रीयांना लग्नगीते लाभली नाहीत. [QE]
64. [QS]त्यांचे याजक तलवारीने पडले, [QE][QS]आणि त्यांच्या विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत. [QE]
65. [QS]मग प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला, [QE][QS]द्राक्षरसामुळे आरोळी मारणाऱ्या सैनिकासारखा तो उठला. [QE]
66. [QS]त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हाकलले; [QE][QS]त्याने त्यांची कायमची नामुष्की केली. [QE]
67. [QS]त्याने योसेफाचा तंबू नाकारला, [QE][QS]आणि त्याने एफ्राईमाच्या वंशाचा स्वीकार केला नाही. [QE]
68. [QS]त्याने यहूदाच्या वंशाला निवडले, [QE][QS]आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला. [QE]
69. [QS]उंच आकाशासारखे व आपण सर्वकाळ स्थापिलेल्या [QE][QS]पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले. [QE]
70. [QS]त्याने आपला सेवक दावीदाला निवडले, [QE][QS]आणि त्यास त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले. [QE]
71. [QS]आपले लोक याकोब व आपले वतन इस्राएल यांचे पालन [QE][QS]करण्यास त्याने त्यास दुभत्या मेंढ्याच्या मागून काढून आणले. [QE]
72. [QS]दावीदाने आपल्या मनाच्या सरळतेने त्याचे पालन केले, [QE][QS]आणि आपल्या हातच्या कौशल्याने त्यास मार्ग दाखविला. [QE]