मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1यरूशलेमेच्या नाशामुळे विलाप }[PS]*आसाफाचे स्तोत्र *[PE][QS]हे देवा, परकी राष्ट्रे तुझ्या वतनात शिरली आहेत; [QE][QS]त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे; [QE][QS]त्यांनी यरूशलेमेचे ढिगारे केले आहेत. [QE]
2. [QS]त्यांनी तुझ्या सेवकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना, [QE][QS]व पृथ्वीवरील पशूंना तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मांस खाण्यासाठी दिले आहे. [QE]
3. [QS]त्यांनी यरूशलेमेभोवती पाण्यासारखे रक्ताचे पाट वाहविले आहेत; [QE][QS]आणि त्यांना पुरण्यास कोणी राहिले नव्हते. [QE]
4. [QS]आम्ही आमच्या शेजाऱ्यांस निंदास्पद, [QE][QS]आमच्या भोवतालच्या लोकांस थट्टा आणि उपहास असे झालो आहोत. [QE]
5. [QS]हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? सर्वकाळपर्यंत तू रागावलेला राहशील का? [QE][QS]तुझी ईर्षा अग्नीसारखी कोठपर्यंत जळत राहील? [QE]
6. [QS]जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, जी राज्ये तुझ्या नावाने धावा करीत नाहीत, [QE][QS]त्यांच्यावर तू आपला क्रोध ओत. [QE]
7. [QS]कारण त्यांनी याकोबाला खाऊन टाकले आहे, [QE][QS]आणि त्यांनी त्याच्या खेड्यांचा नाश केला आहे. [QE]
8. [QS]आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची पापे आठवू नकोस. [QE][QS]तुझी करुणा आमच्यावर लवकर होवो, [QE][QS]कारण आम्हास तुझी नितांत गरज आहे. [QE]
9. [QS]हे आमच्या तारणाऱ्या देवा, तू आपल्या नावाच्या गौरवाकरता, आम्हास मदत कर; [QE][QS]आम्हास वाचव आणि आपल्या नावाकरता आमच्या पापांची क्षमा कर. [QE]
10. [QS]ह्यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे? [QE][QS]तुझ्या सेवकांचे जे रक्त पाडले गेले, [QE][QS]त्याबद्दलचा सूड उगविण्यात आला आहे हे आमच्या देखत राष्ट्रांमध्ये कळावे. [QE]
11. [QS]कैद्यांचे कण्हणे तुझ्या कानी येऊ दे; [QE][QS]ज्या मुलांना मारण्यासाठी नेमले आहे त्यांना आपल्या महान सामर्थ्याने जिवंत ठेव. [QE]
12. [QS]हे प्रभू, आमच्या शेजारी राष्ट्रांनी ज्या अपमानाने तुला अपमानीत केले [QE][QS]त्यांच्या पदरी तो उलट सात पटीने घाल. [QE]
13. [QS]मग आम्ही तुझे लोक आणि तुझ्या कळपातील मेंढरे ते [QE][QS]आम्ही सर्वकाळ तुला धन्यवाद देऊ. [QE][QS]आम्ही सर्व पिढ्यानपिढ्या तुझी स्तुती वर्णीत जाऊ. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 79 / 150
यरूशलेमेच्या नाशामुळे विलाप 1 आसाफाचे स्तोत्र हे देवा, परकी राष्ट्रे तुझ्या वतनात शिरली आहेत; त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे; त्यांनी यरूशलेमेचे ढिगारे केले आहेत. 2 त्यांनी तुझ्या सेवकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना, व पृथ्वीवरील पशूंना तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मांस खाण्यासाठी दिले आहे. 3 त्यांनी यरूशलेमेभोवती पाण्यासारखे रक्ताचे पाट वाहविले आहेत; आणि त्यांना पुरण्यास कोणी राहिले नव्हते. 4 आम्ही आमच्या शेजाऱ्यांस निंदास्पद, आमच्या भोवतालच्या लोकांस थट्टा आणि उपहास असे झालो आहोत. 5 हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? सर्वकाळपर्यंत तू रागावलेला राहशील का? तुझी ईर्षा अग्नीसारखी कोठपर्यंत जळत राहील? 6 जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, जी राज्ये तुझ्या नावाने धावा करीत नाहीत, त्यांच्यावर तू आपला क्रोध ओत. 7 कारण त्यांनी याकोबाला खाऊन टाकले आहे, आणि त्यांनी त्याच्या खेड्यांचा नाश केला आहे. 8 आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची पापे आठवू नकोस. तुझी करुणा आमच्यावर लवकर होवो, कारण आम्हास तुझी नितांत गरज आहे. 9 हे आमच्या तारणाऱ्या देवा, तू आपल्या नावाच्या गौरवाकरता, आम्हास मदत कर; आम्हास वाचव आणि आपल्या नावाकरता आमच्या पापांची क्षमा कर. 10 ह्यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचे जे रक्त पाडले गेले, त्याबद्दलचा सूड उगविण्यात आला आहे हे आमच्या देखत राष्ट्रांमध्ये कळावे. 11 कैद्यांचे कण्हणे तुझ्या कानी येऊ दे; ज्या मुलांना मारण्यासाठी नेमले आहे त्यांना आपल्या महान सामर्थ्याने जिवंत ठेव. 12 हे प्रभू, आमच्या शेजारी राष्ट्रांनी ज्या अपमानाने तुला अपमानीत केले त्यांच्या पदरी तो उलट सात पटीने घाल. 13 मग आम्ही तुझे लोक आणि तुझ्या कळपातील मेंढरे ते आम्ही सर्वकाळ तुला धन्यवाद देऊ. आम्ही सर्व पिढ्यानपिढ्या तुझी स्तुती वर्णीत जाऊ.
Total 150 अध्याय, Selected धडा 79 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References