1. {देवाचा गौरव आणि मानवाची थोरवी} PS हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे.
|
2. तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून,
बाळांच्या आणि तान्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली. |
4. तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी?
किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे? |
5. तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा * देवदूतांपेक्षा थोडेसेच कमी केले आहेस.
आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे. |
6. तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस.
तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस. |