मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देवाचा गौरव आणि मानवाची थोरवी} [PS] हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे. [QBR]
2. तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून, [QBR] बाळांच्या आणि तान्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली. [QBR]
3. तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या [QBR] आकाशाकडे, चंद्र आणि ताऱ्यांकडे मी जेव्हा बघतो. [QBR]
4. तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी? [QBR] किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे? [QBR]
5. तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा [* देवदूतांपेक्षा] थोडेसेच कमी केले आहेस. [QBR] आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे. [QBR]
6. तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस. [QBR] तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस. [QBR]
7. सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशूसुद्धा. [QBR]
8. आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे [QBR] जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व. [QBR]
9. हे परमेश्वरा, आमच्या देवा, [QBR] सर्व पृथ्वीत तुझे नाव किती उत्कृष्ट आहे! [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 8 / 150
स्तोत्रसंहिता 8:8
देवाचा गौरव आणि मानवाची थोरवी 1 हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे. 2 तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून, बाळांच्या आणि तान्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली. 3 तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे, चंद्र आणि ताऱ्यांकडे मी जेव्हा बघतो. 4 तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी? किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे? 5 तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा * देवदूतांपेक्षा थोडेसेच कमी केले आहेस. आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे. 6 तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस. तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस. 7 सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशूसुद्धा. 8 आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व. 9 हे परमेश्वरा, आमच्या देवा, सर्व पृथ्वीत तुझे नाव किती उत्कृष्ट आहे!
Total 150 अध्याय, Selected धडा 8 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References