1. {#1इस्त्राएल लोकांस परत आणण्यासाठी काकळूता }[PS]*आसाफाचे स्तोत्र *[PE][QS]हे इस्राएलाच्या मेंढपाळा, [QE][QS]जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवितोस तो तू लक्ष दे. [QE][QS]जो तू करुबांच्यावर बसतोस, आम्हावर प्रकाश पाड. [QE]
2. [QS]एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर तू आपल्या सामर्थ्याने खळबळ उडव; [QE][QS]ये व आम्हास वाचव. [QE]
3. [QS]हे देवा, तू आमचा पुन्हा स्वीकार कर; [QE][QS]आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्ही वाचू. [QE]
4. [QS]हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, [QE][QS]तुझे लोक प्रार्थना करीत असता तू किती वेळ कोपलेला राहशील? [QE]
5. [QS]तू त्यांना अश्रूंची भाकर खावयास दिली आहे. [QE][QS]आणि मोठ्या प्रमाणात आसवे पिण्यास दिली आहेत. [QE]
6. [QS]तू आम्हास आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त करतोस, [QE][QS]आणि आमचे शत्रू आपसात आम्हास हसतात. [QE]
7. [QS]हे सेनाधीश देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर. [QE][QS]आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्हास वाचव. [QE]
8. [QS]मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणिला; [QE][QS]राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला. [QE]
9. [QS]तू त्याकरता जागा तयार केली; [QE][QS]त्याने मूळ धरले आणि देश भरून टाकला. [QE]
10. [QS]त्याच्या सावलीने पर्वत, [QE][QS]त्याच्या फांद्यांनी देवाचे उच्च गंधसरू आच्छादून टाकले. [QE]
11. [QS]त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत [QE][QS]आणि आपले कोंब फरात नदीपर्यंत पाठविले. [QE]
12. [QS]तू त्यांची कुंपणे कां मोडली? [QE][QS]त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याचे फळ तोडतात. [QE]
13. [QS]रानडुकरे येऊन त्याची नासधूस करतात. [QE][QS]आणि रानटी पशू त्यास खाऊन टाकतात. [QE]
14. [QS]हे सेनाधीश देवा, तू मागे फिर; [QE][QS]स्वर्गातून खाली बघ आणि लक्ष पुरव आणि या द्राक्षवेलीची काळजी घे. [QE]
15. [QS]हे मूळ तू आपल्या उजव्या हाताने लाविले आहे, [QE][QS]जो कोंब तू आपणासाठी सबळ केला आहे त्याचे रक्षण कर. [QE]
16. [QS]ती अग्नीने जळाली आहे आणि ती तोडून टाकली आहे; [QE][QS]तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे शत्रू नष्ट होतात. [QE]
17. [QS]तुझ्या उजव्या हाताला असलेल्या मनुष्यावर, [QE][QS]तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो; [QE]
18. [QS]मग आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही; [QE][QS]तू आम्हास जिवंत कर आणि आम्ही तुझ्या नावाचा धावा करू. [QE]
19. [QS]हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हास परत आण. [QE][QS]आमच्यावर आपला मुखप्रकाश पाड आणि आमचा बचाव होईल. [QE]