1. {देवाचा चांगुलपणा व इस्त्राएलाचा बंडखोरपणा} PS देव जो आमचे सामर्थ्य, त्यास मोठ्याने गा;
याकोबाच्या देवाचा आनंदाने जयजयकार करा. |
3. नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस,
आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. |
5. जेव्हा तो मिसर देशाविरूद्ध गेला,
तेव्हा त्याने योसेफामध्ये त्याने साक्षीसाठी हा नियम लावला. तेथे मला न समजणारी भाषा मी ऐकली. |
7. तू संकटात असता आरोळी केली, आणि मी तुला मदत केली;
मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले; मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली. |
8. अहो माझ्या लोकांनो, माझे ऐका, कारण मी तुम्हास सूचना देतो,
हे इस्राएला जर तू मात्र माझे ऐकशील तर बरे होईल. |
10. मीच तुझा देव परमेश्वर आहे,
मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तू आपले तोंड चांगले उघड आणि मी ते भरीन. |
12. म्हणून मी त्यांना त्यांच्या हटवादी मार्गाने वागू दिले,
अशासाठी की जे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे ते त्यांनी करावे. |