मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देवाचा चांगुलपणा व इस्त्राएलाचा बंडखोरपणा} [PS] देव जो आमचे सामर्थ्य, त्यास मोठ्याने गा; [QBR] याकोबाच्या देवाचा आनंदाने जयजयकार करा. [QBR]
2. गाणे गा आणि डफ वाजवा, [QBR] मंजुळ वीणा व सतार वाजवा. [QBR]
3. नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस, [QBR] आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. [QBR]
4. कारण हा इस्राएलासाठी नियम आहे. [QBR] हा याकोबाच्या देवाने दिलेला विधी आहे. [QBR]
5. जेव्हा तो मिसर देशाविरूद्ध गेला, [QBR] तेव्हा त्याने योसेफामध्ये त्याने साक्षीसाठी हा नियम लावला. [QBR] तेथे मला न समजणारी भाषा मी ऐकली. [QBR]
6. मी त्याच्या खांद्यावरचे ओझे काढून टाकले आहे; [QBR] टोपली धरण्यापासून त्याचे हात मोकळे केले आहेत. [QBR]
7. तू संकटात असता आरोळी केली, आणि मी तुला मदत केली; [QBR] मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले; [QBR] मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली. [QBR]
8. अहो माझ्या लोकांनो, माझे ऐका, कारण मी तुम्हास सूचना देतो, [QBR] हे इस्राएला जर तू मात्र माझे ऐकशील तर बरे होईल. [QBR]
9. तुझ्यामध्ये परके देव नसावेत; [QBR] तू कोणत्याही परक्या देवाची उपासना करू नकोस. [QBR]
10. मीच तुझा देव परमेश्वर आहे, [QBR] मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले. [QBR] तू आपले तोंड चांगले उघड आणि मी ते भरीन. [QBR]
11. परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही; [QBR] इस्राएलाने माझी आज्ञा पाळली नाही. [QBR]
12. म्हणून मी त्यांना त्यांच्या हटवादी मार्गाने वागू दिले, [QBR] अशासाठी की जे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे ते त्यांनी करावे. [QBR]
13. अहा, जर माझे लोक माझे ऐकतील; [QBR] अहा, जर माझे लोक माझ्या मार्गाने चालतील तर बरे होईल! [QBR]
14. मग मी त्यांच्या शत्रूंचा त्वरेने पराभव करीन [QBR] आणि अत्याचार करणाऱ्याविरूद्ध आपला हात फिरवीन. [QBR]
15. परमेश्वराचा द्वेष करणारे भितीने त्याच्यापुढे दबून जातील. [QBR] ते सर्वकाळ अपमानीत राहतील. [QBR]
16. मी इस्राएलास उत्तम गहू खाण्यास देईन; [QBR] मी तुला खडकातल्या मधाने तृप्त करीन. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 81 / 150
स्तोत्रसंहिता 81:49
देवाचा चांगुलपणा व इस्त्राएलाचा बंडखोरपणा 1 देव जो आमचे सामर्थ्य, त्यास मोठ्याने गा; याकोबाच्या देवाचा आनंदाने जयजयकार करा. 2 गाणे गा आणि डफ वाजवा, मंजुळ वीणा व सतार वाजवा. 3 नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. 4 कारण हा इस्राएलासाठी नियम आहे. हा याकोबाच्या देवाने दिलेला विधी आहे. 5 जेव्हा तो मिसर देशाविरूद्ध गेला, तेव्हा त्याने योसेफामध्ये त्याने साक्षीसाठी हा नियम लावला. तेथे मला न समजणारी भाषा मी ऐकली. 6 मी त्याच्या खांद्यावरचे ओझे काढून टाकले आहे; टोपली धरण्यापासून त्याचे हात मोकळे केले आहेत. 7 तू संकटात असता आरोळी केली, आणि मी तुला मदत केली; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले; मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली. 8 अहो माझ्या लोकांनो, माझे ऐका, कारण मी तुम्हास सूचना देतो, हे इस्राएला जर तू मात्र माझे ऐकशील तर बरे होईल. 9 तुझ्यामध्ये परके देव नसावेत; तू कोणत्याही परक्या देवाची उपासना करू नकोस. 10 मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तू आपले तोंड चांगले उघड आणि मी ते भरीन. 11 परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही; इस्राएलाने माझी आज्ञा पाळली नाही. 12 म्हणून मी त्यांना त्यांच्या हटवादी मार्गाने वागू दिले, अशासाठी की जे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे ते त्यांनी करावे. 13 अहा, जर माझे लोक माझे ऐकतील; अहा, जर माझे लोक माझ्या मार्गाने चालतील तर बरे होईल! 14 मग मी त्यांच्या शत्रूंचा त्वरेने पराभव करीन आणि अत्याचार करणाऱ्याविरूद्ध आपला हात फिरवीन. 15 परमेश्वराचा द्वेष करणारे भितीने त्याच्यापुढे दबून जातील. ते सर्वकाळ अपमानीत राहतील. 16 मी इस्राएलास उत्तम गहू खाण्यास देईन; मी तुला खडकातल्या मधाने तृप्त करीन.
Total 150 अध्याय, Selected धडा 81 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References