1. {#1इस्त्राएलाच्या शत्रूंच्या नाशासाठी प्रार्थना }[PS]*आसाफाचे स्तोत्र *[PE][QS]हे देवा, गप्प राहू नकोस. [QE][QS]हे देवा, आमच्याकडे दुर्लक्ष करू नको आणि स्वस्थ राहू नकोस. [QE]
2. [QS]पाहा, तुझे शत्रू गलबला करीत आहेत, [QE][QS]आणि जे तुझा द्वेष करतात त्यांनी आपले डोके उंच केले आहे. [QE]
3. [QS]ते तुझ्या लोकांविरूद्ध गुप्त योजना आखतात. [QE][QS]आणि ते एकत्र मिळून तुझ्या आश्रितांविरूद्ध योजना करतात. [QE]
4. [QS]ते म्हणतात, “या आणि आपण त्यांचा एक राष्ट्र म्हणून नाश करू. [QE][QS]यानंतर इस्राएलाचे नावही आणखी आठवणित राहणार नाही. [QE]
5. [QS]त्यांनी एकमताने, एकत्र मिळून मसलत केली आहे, [QE][QS]ते तुझ्याविरूद्ध करार करतात. [QE]
6. [QS]ते तंबूत राहणारे अदोमी आणि इश्माएली, मवाब आणि हगारी, [QE]
7. [QS]गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत. [QE]
8. [QS]अश्शूरानेही त्यांच्याशी करार केला आहे; [QE][QS]ते लोटाच्या वंशजांना मदत करीत आहेत. [QE]
9. [QS]तू जसे मिद्यानाला, [QE][QS]सीसरा व याबीन यांना किशोन नदीजवळ केलेस तसेच तू त्यांना कर. [QE]
10. [QS]ते एन-दोर येथे नष्ट झाले, [QE][QS]आणि ते भूमीला खत झाले. [QE]
11. [QS]तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर, [QE][QS]जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर. [QE]
12. [QS]ते म्हणाले, देवाची निवासस्थाने [QE][QS]आपण आपल्या ताब्यात घेऊ. [QE]
13. [QS]हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे, [QE][QS]वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर. [QE]
14. [QS]अग्नी जसा वनाला जाळतो, [QE][QS]व ज्वाला जशी डोंगराला पेटवते. [QE]
15. [QS]तसा तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर, [QE][QS]आणि आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड. [QE]
16. [QS]हे परमेश्वरा, त्यांची चेहरे लज्जेने भर [QE][QS]यासाठी की, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा. [QE]
17. [QS]ते सदासर्वकाळ लज्जित व घाबरे होवोत; [QE][QS]ते लज्जित होऊन नष्ट होवोत. [QE]
18. [QS]नंतर तू, मात्र तूच परमेश्वर, [QE][QS]या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळेल. [QE]