मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
स्तोत्रसंहिता
1. {#1देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ }[PS]*कोरहाच्या मुलांची स्तोत्रे *[PE][QS]हे सेनाधीश परमेश्वरा, [QE][QS]तू जेथे राहतो ती जागा किती लावण्यपूर्ण आहे. [QE]
2. [QS]माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली, असून तो अतिउत्सुकही झाला आहे; [QE][QS]माझा जीव व देह जिवंत देवाला आरोळी मारीत आहे. [QE]
3. [QS]हे सेनाधीश परमेश्वरा, [QE][QS]माझ्या राजा, माझ्या देवा, [QE][QS]तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला आपले घर [QE][QS]आणि निळवीला आपली पिल्ले ठेवण्यासाठी कोटे सापडले आहे. [QE]
4. [QS]जे तुझ्या घरात राहतात ते आशीर्वादित आहेत; [QE][QS]ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. [QE]
5. [QS]ज्या मनुष्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे, [QE][QS]ज्याच्या मनात सीयोनेचे राजमार्ग आहेत तो आशीर्वादित आहे. [QE]
6. [QS]शोकाच्या [* बाका ]खोऱ्यातून जाताना, त्यांना पिण्याच्या पाण्याचे झरे सापडतात. [QE][QS]आगोटीचा पाऊस त्यांना पाण्याच्या तलावाने झाकतो. [QE]
7. [QS]ते सामर्थ्यापासून सामर्थ्यात जातात; [QE][QS]त्यातील प्रत्येकजणाला सियोनेत देवाचे दर्शन लाभते. [QE]
8. [QS]हे सेनाधीश परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; [QE][QS]याकोबाच्या देवा, मी जे सांगतो ते माझे ऐक. [QE]
9. [QS]हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर, [QE][QS]तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. [QE]
10. [QS]तुझ्या अंगणातला एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसांपेक्षा उत्तम आहे; [QE][QS]दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला चांगले आहे. [QE]
11. [QS]कारण परमेश्वर देव आमचा सूर्य आणि ढाल आहे; [QE][QS]परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो; [QE][QS]जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही. [QE]
12. [QS]हे सेनाधीश परमेश्वरा, [QE][QS]जो मनुष्य तुझ्यावर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित आहे. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 84 / 150
देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ 1 कोरहाच्या मुलांची स्तोत्रे हे सेनाधीश परमेश्वरा, तू जेथे राहतो ती जागा किती लावण्यपूर्ण आहे. 2 माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली, असून तो अतिउत्सुकही झाला आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला आरोळी मारीत आहे. 3 हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला आपले घर आणि निळवीला आपली पिल्ले ठेवण्यासाठी कोटे सापडले आहे. 4 जे तुझ्या घरात राहतात ते आशीर्वादित आहेत; ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. 5 ज्या मनुष्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे, ज्याच्या मनात सीयोनेचे राजमार्ग आहेत तो आशीर्वादित आहे. 6 शोकाच्या * बाका खोऱ्यातून जाताना, त्यांना पिण्याच्या पाण्याचे झरे सापडतात. आगोटीचा पाऊस त्यांना पाण्याच्या तलावाने झाकतो. 7 ते सामर्थ्यापासून सामर्थ्यात जातात; त्यातील प्रत्येकजणाला सियोनेत देवाचे दर्शन लाभते. 8 हे सेनाधीश परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; याकोबाच्या देवा, मी जे सांगतो ते माझे ऐक. 9 हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. 10 तुझ्या अंगणातला एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला चांगले आहे. 11 कारण परमेश्वर देव आमचा सूर्य आणि ढाल आहे; परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो; जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही. 12 हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 84 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References