मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ} [PS] हे सेनाधीश परमेश्वरा, [QBR] तू जेथे राहतो ती जागा किती लावण्यपूर्ण आहे. [QBR]
2. माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली, असून तो अतिउत्सुकही झाला आहे; [QBR] माझा जीव व देह जिवंत देवाला आरोळी मारीत आहे. [QBR]
3. हे सेनाधीश परमेश्वरा, [QBR] माझ्या राजा, माझ्या देवा, [QBR] तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला आपले घर [QBR] आणि निळवीला आपली पिल्ले ठेवण्यासाठी कोटे सापडले आहे. [QBR]
4. जे तुझ्या घरात राहतात ते आशीर्वादित आहेत; [QBR] ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. [QBR]
5. ज्या मनुष्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे, [QBR] ज्याच्या मनात सीयोनेचे राजमार्ग आहेत तो आशीर्वादित आहे. [QBR]
6. शोकाच्या [* बाका] खोऱ्यातून जाताना, त्यांना पिण्याच्या पाण्याचे झरे सापडतात. [QBR] आगोटीचा पाऊस त्यांना पाण्याच्या तलावाने झाकतो. [QBR]
7. ते सामर्थ्यापासून सामर्थ्यात जातात; [QBR] त्यातील प्रत्येकजणाला सियोनेत देवाचे दर्शन लाभते. [QBR]
8. हे सेनाधीश परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; [QBR] याकोबाच्या देवा, मी जे सांगतो ते माझे ऐक. [QBR]
9. हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर, [QBR] तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. [QBR]
10. तुझ्या अंगणातला एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसांपेक्षा उत्तम आहे; [QBR] दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला चांगले आहे. [QBR]
11. कारण परमेश्वर देव आमचा सूर्य आणि ढाल आहे; [QBR] परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो; [QBR] जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही. [QBR]
12. हे सेनाधीश परमेश्वरा, [QBR] जो मनुष्य तुझ्यावर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 84 / 150
स्तोत्रसंहिता 84:80
देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ 1 हे सेनाधीश परमेश्वरा, तू जेथे राहतो ती जागा किती लावण्यपूर्ण आहे. 2 माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली, असून तो अतिउत्सुकही झाला आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला आरोळी मारीत आहे. 3 हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला आपले घर आणि निळवीला आपली पिल्ले ठेवण्यासाठी कोटे सापडले आहे. 4 जे तुझ्या घरात राहतात ते आशीर्वादित आहेत; ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. 5 ज्या मनुष्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे, ज्याच्या मनात सीयोनेचे राजमार्ग आहेत तो आशीर्वादित आहे. 6 शोकाच्या * बाका खोऱ्यातून जाताना, त्यांना पिण्याच्या पाण्याचे झरे सापडतात. आगोटीचा पाऊस त्यांना पाण्याच्या तलावाने झाकतो. 7 ते सामर्थ्यापासून सामर्थ्यात जातात; त्यातील प्रत्येकजणाला सियोनेत देवाचे दर्शन लाभते. 8 हे सेनाधीश परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; याकोबाच्या देवा, मी जे सांगतो ते माझे ऐक. 9 हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. 10 तुझ्या अंगणातला एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला चांगले आहे. 11 कारण परमेश्वर देव आमचा सूर्य आणि ढाल आहे; परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो; जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही. 12 हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 84 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References