1. {#1देवाने सर्वदा दया करावी म्हणून प्रार्थना }[PS]*दाविदाची प्रार्थना *[PE][QS]हे परमेश्वरा, माझे ऐक, आणि मला उत्तर दे, [QE][QS]कारण मी दीन आणि दरिद्री आहे. [QE]
2. [QS]माझे रक्षण कर, कारण मी तुझा निष्ठावंत आहे; [QE][QS]हे माझ्या देवा, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सेवकाचे रक्षण कर. [QE]
3. [QS]हे प्रभू, माझ्यावर दया कर, [QE][QS]कारण मी दिवसभर तुला हाक मारतो. [QE]
4. [QS]हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव आनंदित कर, [QE][QS]कारण मी आपला जीव वर तुझ्याकडे लावतो. [QE]
5. [QS]हे प्रभू, तू उत्तम आहेस आणि क्षमा करण्यास तयार आहेस, [QE][QS]आणि जे सर्व तुला हाक मारतात त्यांना तू महान दया दाखवतोस. [QE]
6. [QS]हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला कान दे; [QE][QS]माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे. [QE]
7. [QS]हे परमेश्वरा, मी आपल्या संकटाच्या दिवसात तुला हाक मारीन, [QE][QS]कारण तू मला उत्तर देशील. [QE]
8. [QS]हे प्रभू, देवांमध्ये तुझ्याशी तुलना करता येईल असा कोणीही नाही. [QE][QS]तुझ्या कृत्यासारखी कोणीतीही कृत्ये नाहीत. [QE]
9. [QS]हे प्रभू, तू निर्माण केलेली सर्व राष्ट्रे येतील आणि तुझ्यापुढे नमन करतील. [QE][QS]ते तुझ्या नावाला आदर देतील. [QE]
10. [QS]कारण तू महान आहेस व तू आश्चर्यकारक गोष्टी करतोस; [QE][QS]तूच फक्त देव आहेस. [QE]
11. [QS]हे परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव, मग मी तुझ्या सत्यात चालेन. [QE][QS]तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. [QE]
12. [QS]हे प्रभू, माझ्या देवा, मी अगदी आपल्या मनापासून तुझी स्तुती करीन; [QE][QS]मी सर्वकाळ तुझ्या नावाचे गौरव करीन. [QE]
13. [QS]कारण माझ्यावर तुझी महान दया आहे; [QE][QS]तू माझा जीव मृत्यूलोकापासून सोडवला आहेस. [QE]
14. [QS]हे देवा, उद्धट लोक माझ्याविरूद्ध उठले आहेत. [QE][QS]हिंसाचारी लोकांची टोळी माझा जीव घेण्यास पाहत आहे. [QE][QS]त्यांना तुझ्यासाठी काही आदर नाही. [QE]
15. [QS]तरी हे प्रभू, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस. [QE][QS]मंदक्रोध, आणि दया व सत्य यामध्ये विपुल आहेस. [QE]
16. [QS]तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर; [QE][QS]तू आपल्या दासास आपले सामर्थ्य दे; [QE][QS]आपल्या दासीच्या मुलाचे तारण कर. [QE]
17. [QS]हे परमेश्वरा, तुझ्या अनुग्रहाचे चिन्ह दाखव. [QE][QS]कारण तू माझे साहाय्य व सांत्वन केले आहे. [QE][QS]मग माझा द्वेष करणाऱ्यांनी ते पाहावे, आणि लज्जित व्हावे. [QE]