1. {सीयोनेत राहण्याचा मान} [PS] परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे. [QBR]
2. याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास [QBR] सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे. [QBR]
3. हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. [QBR]
4. राहाब [* मिसर देश] आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन. [QBR] पाहा, पलिष्टी, सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच. [QBR]
5. सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता; [QBR] आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील. [QBR]
6. लोकांची नोंदणी करताना, [QBR] ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील. [QBR]
7. गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की, [QBR] माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.” [PE]