मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {मृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा, [QBR] मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो. [QBR]
2. माझी प्रार्थना ऐक; [QBR] माझ्या आरोळीकडे लक्ष दे. [QBR]
3. कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे, [QBR] आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे. [QBR]
4. खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत; [QBR] मी असहाय्य मनुष्यासारखा आहे. [QBR]
5. मला मृतामध्ये सोडून दिले आहे; [QBR] अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो, [QBR] ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस, [QBR] ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे. [QBR]
6. तू मला त्या खड्‌यांतल्या खालच्या भागात, [QBR] काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस. [QBR]
7. तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे, [QBR] आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत. [QBR]
8. तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात. [QBR] त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे; [QBR] मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही. [QBR]
9. कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत; [QBR] हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे. [QBR] मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे. [QBR]
10. तू मृतांसाठी चमत्कार करशील काय? [QBR] जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय? [QBR]
11. तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा [QBR] मृतांच्या जागी घोषणा होईल का? [QBR]
12. तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात [QBR] किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय? [QBR]
13. परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; [QBR] सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते. [QBR]
14. हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? [QBR] तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस? [QBR]
15. मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे; [QBR] मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही. [QBR]
16. तुझा संतप्त क्रोध माझ्यावरून चालला आहे, [QBR] आणि तुझ्या घाबरून सोडणाऱ्या कृत्यांनी माझा संपूर्ण नाश केला आहे. [QBR]
17. त्यांनी दिवसभर मला जलाप्रमाणे घेरले आहे; [QBR] त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे. [QBR]
18. तू माझ्यापासून प्रत्येक मित्राला आणि परिचितांना दूर केले आहेस. [QBR] माझा परिचयाचा केवळ काळोख आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 88 / 150
स्तोत्रसंहिता 88:134
मृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना 1 हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा, मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो. 2 माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे. 3 कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे, आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे. 4 खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत; मी असहाय्य मनुष्यासारखा आहे. 5 मला मृतामध्ये सोडून दिले आहे; अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो, ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस, ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे. 6 तू मला त्या खड्‌यांतल्या खालच्या भागात, काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस. 7 तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे, आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत. 8 तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात. त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे; मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही. 9 कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत; हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे. मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे. 10 तू मृतांसाठी चमत्कार करशील काय? जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय? 11 तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा मृतांच्या जागी घोषणा होईल का? 12 तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय? 13 परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते. 14 हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस? 15 मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे; मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही. 16 तुझा संतप्त क्रोध माझ्यावरून चालला आहे, आणि तुझ्या घाबरून सोडणाऱ्या कृत्यांनी माझा संपूर्ण नाश केला आहे. 17 त्यांनी दिवसभर मला जलाप्रमाणे घेरले आहे; त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे. 18 तू माझ्यापासून प्रत्येक मित्राला आणि परिचितांना दूर केले आहेस. माझा परिचयाचा केवळ काळोख आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 88 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References