मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {मृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा, [QBR] मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो. [QBR]
2. माझी प्रार्थना ऐक; [QBR] माझ्या आरोळीकडे लक्ष दे. [QBR]
3. कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे, [QBR] आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे. [QBR]
4. खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत; [QBR] मी असहाय्य मनुष्यासारखा आहे. [QBR]
5. मला मृतामध्ये सोडून दिले आहे; [QBR] अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो, [QBR] ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस, [QBR] ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे. [QBR]
6. तू मला त्या खड्‌यांतल्या खालच्या भागात, [QBR] काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस. [QBR]
7. तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे, [QBR] आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत. [QBR]
8. तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात. [QBR] त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे; [QBR] मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही. [QBR]
9. कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत; [QBR] हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे. [QBR] मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे. [QBR]
10. तू मृतांसाठी चमत्कार करशील काय? [QBR] जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय? [QBR]
11. तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा [QBR] मृतांच्या जागी घोषणा होईल का? [QBR]
12. तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात [QBR] किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय? [QBR]
13. परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; [QBR] सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते. [QBR]
14. हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? [QBR] तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस? [QBR]
15. मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे; [QBR] मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही. [QBR]
16. तुझा संतप्त क्रोध माझ्यावरून चालला आहे, [QBR] आणि तुझ्या घाबरून सोडणाऱ्या कृत्यांनी माझा संपूर्ण नाश केला आहे. [QBR]
17. त्यांनी दिवसभर मला जलाप्रमाणे घेरले आहे; [QBR] त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे. [QBR]
18. तू माझ्यापासून प्रत्येक मित्राला आणि परिचितांना दूर केले आहेस. [QBR] माझा परिचयाचा केवळ काळोख आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 88 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 88:44
1. {मृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना} PS हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा,
मी रात्र दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो.
2. माझी प्रार्थना ऐक;
माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
3. कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे,
आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे.
4. खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत;
मी असहाय्य मनुष्यासारखा आहे.
5. मला मृतामध्ये सोडून दिले आहे;
अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो,
ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस,
ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे.
6. तू मला त्या खड्‌यांतल्या खालच्या भागात,
काळोखात अगदी खोल जागी टाकले आहेस.
7. तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे,
आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत.
8. तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात.
त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे;
मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही.
9. कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत;
हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे.
मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे.
10. तू मृतांसाठी चमत्कार करशील काय?
जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय?
11. तुझ्या दयेची प्रामाणिकपणाची कबरेत किंवा
मृतांच्या जागी घोषणा होईल का?
12. तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात
किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय?
13. परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो;
सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते.
14. हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास?
तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस?
15. मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे;
मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही.
16. तुझा संतप्त क्रोध माझ्यावरून चालला आहे,
आणि तुझ्या घाबरून सोडणाऱ्या कृत्यांनी माझा संपूर्ण नाश केला आहे.
17. त्यांनी दिवसभर मला जलाप्रमाणे घेरले आहे;
त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे.
18. तू माझ्यापासून प्रत्येक मित्राला आणि परिचितांना दूर केले आहेस.
माझा परिचयाचा केवळ काळोख आहे. PE
Total 150 Chapters, Current Chapter 88 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References