मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1मृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना }[PS]*कोरहाच्या मुलांची स्तोत्रे *[PE][QS]हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा, [QE][QS]मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो. [QE]
2. [QS]माझी प्रार्थना ऐक; [QE][QS]माझ्या आरोळीकडे लक्ष दे. [QE]
3. [QS]कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे, [QE][QS]आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे. [QE]
4. [QS]खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत; [QE][QS]मी असहाय्य मनुष्यासारखा आहे. [QE]
5. [QS]मला मृतामध्ये सोडून दिले आहे; [QE][QS]अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो, [QE][QS]ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस, [QE][QS]ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे. [QE]
6. [QS]तू मला त्या खड्‌यांतल्या खालच्या भागात, [QE][QS]काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस. [QE]
7. [QS]तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे, [QE][QS]आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत. [QE]
8. [QS]तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात. [QE][QS]त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे; [QE][QS]मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही. [QE]
9. [QS]कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत; [QE][QS]हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे. [QE][QS]मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे. [QE]
10. [QS]तू मृतांसाठी चमत्कार करशील काय? [QE][QS]जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय? [QE]
11. [QS]तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा [QE][QS]मृतांच्या जागी घोषणा होईल का? [QE]
12. [QS]तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात [QE][QS]किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय? [QE]
13. [QS]परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; [QE][QS]सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते. [QE]
14. [QS]हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? [QE][QS]तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस? [QE]
15. [QS]मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे; [QE][QS]मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही. [QE]
16. [QS]तुझा संतप्त क्रोध माझ्यावरून चालला आहे, [QE][QS]आणि तुझ्या घाबरून सोडणाऱ्या कृत्यांनी माझा संपूर्ण नाश केला आहे. [QE]
17. [QS]त्यांनी दिवसभर मला जलाप्रमाणे घेरले आहे; [QE][QS]त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे. [QE]
18. [QS]तू माझ्यापासून प्रत्येक मित्राला आणि परिचितांना दूर केले आहेस. [QE][QS]माझा परिचयाचा केवळ काळोख आहे. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 88 / 150
मृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना 1 कोरहाच्या मुलांची स्तोत्रे हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा, मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो. 2 माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे. 3 कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे, आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे. 4 खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत; मी असहाय्य मनुष्यासारखा आहे. 5 मला मृतामध्ये सोडून दिले आहे; अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो, ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस, ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे. 6 तू मला त्या खड्‌यांतल्या खालच्या भागात, काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस. 7 तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे, आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत. 8 तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात. त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे; मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही. 9 कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत; हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे. मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे. 10 तू मृतांसाठी चमत्कार करशील काय? जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय? 11 तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा मृतांच्या जागी घोषणा होईल का? 12 तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय? 13 परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते. 14 हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस? 15 मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे; मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही. 16 तुझा संतप्त क्रोध माझ्यावरून चालला आहे, आणि तुझ्या घाबरून सोडणाऱ्या कृत्यांनी माझा संपूर्ण नाश केला आहे. 17 त्यांनी दिवसभर मला जलाप्रमाणे घेरले आहे; त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे. 18 तू माझ्यापासून प्रत्येक मित्राला आणि परिचितांना दूर केले आहेस. माझा परिचयाचा केवळ काळोख आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 88 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References