1. {#1देवाचा दाविदाशी करार }[PS]*एथानाचे स्तोत्र *[PE][QS]मी परमेश्वराच्या विश्वासाच्या कराराच्या कृतीचे गीत सर्वकाळ गाईन. [QE][QS]मी तुझी सत्यता भावी पिढ्यांना जाहीर करीन. [QE]
2. [QS]कारण मी म्हणालो आहे की, विश्वासाचा करार सर्वकाळासाठी स्थापित होईल; [QE][QS]तुझी सत्यता स्वर्गात तूच स्थापन केली आहेस. [QE]
3. [QS]मी माझ्या निवडलेल्याशी करार केला आहे, [QE][QS]मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे. [QE]
4. [QS]मी तुझ्या वंशाजांची स्थापना सर्वकाळ करीन, [QE][QS]आणि तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थापिन. [QE]
5. [QS]हे परमेश्वरा, तुझ्या विस्मयकारक कृतीची स्तुती आकाश करील, [QE][QS]तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्रजनांच्या मंडळीत होईल. [QE]
6. [QS]कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे? [QE][QS]देवाच्या मुलांपैकी परमेश्वरासारखा कोण आहे? [QE]
7. [QS]पवित्र जनांच्या सभेत ज्याचा सन्मान होतो असा तो देव आहे; [QE][QS]आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या सर्वांपेक्षा तो भितीदायक आहे. [QE]
8. [QS]हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, [QE][QS]हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे? [QE][QS]तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे? [QE]
9. [QS]समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस; [QE][QS]जेव्हा त्याच्या लाटा उसळतात, तेव्हा तू त्यांना शांत करतोस. [QE]
10. [QS]तू राहाबाला [* समुद्र प्राणी ]ठेचून त्याचा चुराडा केलास. [QE][QS]तू तुझ्या बलवान बाहूंनी आपल्या शत्रूंना पांगवलेस. [QE]
11. [QS]आकाश तुझे आहे आणि पृथ्वीही तुझी आहे. [QE][QS]तू जग आणि त्यातले सर्वकाही निर्माण केलेस. [QE]
12. [QS]उत्तर आणि दक्षिण निर्माण केल्या. [QE][QS]ताबोर [† गालील सरोवराच्या दक्षिण टोकावरील पश्चिमेकडील पर्वत ]आणि हर्मोन [‡ गालील सरोवराच्या ईशान्येकडील पर्वत ]तुझ्या नावाचा जयजयकार करतात. [QE]
13. [QS]तुला पराक्रमी भुज आहे आणि तुला बळकट हात आहे [QE][QS]व तुझा उजवा हात उंचावला आहे. [QE]
14. [QS]निती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत. [QE][QS]कराराचा विश्वास आणि सत्य तुझ्यासमोर आहेत. [QE]
15. [QS]जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत. [QE][QS]हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. [QE]
16. [QS]ते दिवसभर तुझ्या नावाची स्तुती करतात, [QE][QS]आणि तुझ्या न्यायीपणाने ते तुला उंचावतात. [QE]
17. [QS]त्यांच्या शक्तीचे वैभव तू आहेस, [QE][QS]आणि तुझ्या कृपेने आम्ही विजयी आहोत. [QE]
18. [QS]कारण आमची ढाल परमेश्वराची आहे; [QE][QS]इस्राएलाचा पवित्र देव आमचा राजा आहे. [QE]
19. [QS]पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास; [QE][QS]तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे; [QE][QS]लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे. [QE]
20. [QS]मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे; [QE][QS]मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे. [QE]
21. [QS]माझा हात त्यास आधार देईल; [QE][QS]माझा बाहू त्यास बलवान करील. [QE]
22. [QS]कोणी शत्रू त्यास फसवणार नाही. [QE][QS]दुष्टांची मुले त्यास छळणार नाहीत. [QE]
23. [QS]मी त्याच्या शत्रूंना त्याच्यापुढे चिरडून टाकीन; [QE][QS]जे त्याचा द्वेष करतात त्यांना मारून टाकीन. [QE]
24. [QS]माझे सत्य आणि विश्वासाचा करार त्यांच्याबरोबर राहील; [QE][QS]माझ्या नावाने ते विजयी होतील. [QE]
25. [QS]मी त्याचा हात समुद्रावर [QE][QS]आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन. [QE]
26. [QS]तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता, [QE][QS]माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस. [QE]
27. [QS]आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन, [QE][QS]पृथ्वीवरील राजांत त्यास परमश्रेष्ठ करीन. [QE]
28. [QS]मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्वकाळ विस्तारील, [QE][QS]आणि त्यांच्याबरोबरचा माझा करार सर्वकाळ टिकेल. [QE]
29. [QS]त्याचे वंश सर्वकाळ राहील, [QE][QS]आणि त्याचे राजासन आकाशाप्रमाणे टिकेल. [QE]
30. [QS]जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले [QE][QS]आणि माझ्या आदेशाचा आज्ञाभंग केला. [QE]
31. [QS]जर त्यांनी माझे नियम मोडले [QE][QS]आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. [QE]
32. [QS]मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने, [QE][QS]आणि त्यांच्या अपराधांना फटक्यांनी शिक्षा करीन. [QE]
33. [QS]परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही; [QE][QS]मी माझ्या वचनाशी निष्ठावान राहीन. [QE]
34. [QS]मी माझा करार मोडणार नाही, [QE][QS]किंवा माझ्या ओठांचे शब्द बदलणार नाही. [QE]
35. [QS]एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे, [QE][QS]आणि मी दावीदाशी खोटे बोलणार नाही. [QE]
36. [QS]त्याची संतती सर्वकाळ राहील, [QE][QS]आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील. [QE]
37. [QS]ते चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल. [QE][QS]आकाशात विश्वसनीय साक्षीदार आहेत. [QE]
38. [QS]पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास, [QE][QS]तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस. [QE]
39. [QS]तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास. [QE][QS]तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास. [QE]
40. [QS]तू त्याच्या सर्व भिंती पाडून टाकल्यास. [QE][QS]तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस. [QE]
41. [QS]सर्व येणारे जाणारे त्यास लुटतात. [QE][QS]तो आपल्या शेजाऱ्यांच्या तिरस्काराचा विषय झाला आहे. [QE]
42. [QS]तू त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहे. [QE][QS]तू त्याच्या सर्व शत्रूंना आनंदित केले आहेस. [QE]
43. [QS]तू त्यांच्या तलवारीची धार बोथट केली आहे. [QE][QS]आणि युद्धात त्यास तू टिकाव धरू दिला नाहीस. [QE]
44. [QS]तू त्याच्या तेजस्वितेचा शेवट केला; [QE][QS]तू त्याचे सिंहासन जमिनीवर खाली आणलेस. [QE]
45. [QS]तू त्याच्या तारुण्याचे दिवस कमी केले आहेत. [QE][QS]तू त्यास लज्जेने झाकले आहेस. [QE]
46. [QS]हे परमेश्वरा, किती वेळ? तू आपल्या स्वतःला सर्वकाळ लपविणार काय? [QE][QS]तुझा राग अग्नीसारखा किती वेळ जळेल? [QE]
47. [QS]माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर, [QE][QS]तू सर्व मानव पुत्र निर्माण केलेस ते व्यर्थच काय? [QE]
48. [QS]कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही [QE][QS]किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवील? [QE]
49. [QS]हे प्रभू, ज्या सत्यतेत तू दावीदाशी शपथ वाहिली, [QE][QS]ती तुझी पूर्वीची विश्वासाच्या कराराची कृत्ये कोठे आहेत? [QE]
50. [QS]हे प्रभू, तुझ्या सेवकाविरूद्धची थट्टा होत आहे; [QE][QS]आणि अनेक राष्ट्राकडून झालेला अपमान मी आपल्या हृदयात सहन करत आहे हे तू लक्षात आण. [QE]
51. [QS]हे परमेश्वरा, तुझे शत्रू जोराने अपमान करतात; [QE][QS]ते तुझ्या अभिषिक्ताच्या पावलांची थट्टा करतात. [QE]
52. [QS]परमेश्वरास सदासर्वकाळ धन्यवाद असो. [QE][QS]आमेन आणि आमेन. [QE]