1. {देवाचा दाविदाशी करार} [PS] मी परमेश्वराच्या विश्वासाच्या कराराच्या कृतीचे गीत सर्वकाळ गाईन. [QBR] मी तुझी सत्यता भावी पिढ्यांना जाहीर करीन. [QBR]
2. कारण मी म्हणालो आहे की, विश्वासाचा करार सर्वकाळासाठी स्थापित होईल; [QBR] तुझी सत्यता स्वर्गात तूच स्थापन केली आहेस. [QBR]
3. मी माझ्या निवडलेल्याशी करार केला आहे, [QBR] मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे. [QBR]
4. मी तुझ्या वंशाजांची स्थापना सर्वकाळ करीन, [QBR] आणि तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थापिन. [QBR]
5. हे परमेश्वरा, तुझ्या विस्मयकारक कृतीची स्तुती आकाश करील, [QBR] तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्रजनांच्या मंडळीत होईल. [QBR]
6. कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे? [QBR] देवाच्या मुलांपैकी परमेश्वरासारखा कोण आहे? [QBR]
7. पवित्र जनांच्या सभेत ज्याचा सन्मान होतो असा तो देव आहे; [QBR] आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या सर्वांपेक्षा तो भितीदायक आहे. [QBR]
8. हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, [QBR] हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे? [QBR] तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे? [QBR]
9. समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस; [QBR] जेव्हा त्याच्या लाटा उसळतात, तेव्हा तू त्यांना शांत करतोस. [QBR]
10. तू राहाबाला [* समुद्र प्राणी] ठेचून त्याचा चुराडा केलास. [QBR] तू तुझ्या बलवान बाहूंनी आपल्या शत्रूंना पांगवलेस. [QBR]
11. आकाश तुझे आहे आणि पृथ्वीही तुझी आहे. [QBR] तू जग आणि त्यातले सर्वकाही निर्माण केलेस. [QBR]
12. उत्तर आणि दक्षिण निर्माण केल्या. [QBR] ताबोर [† गालील सरोवराच्या दक्षिण टोकावरील पश्चिमेकडील पर्वत] आणि हर्मोन [‡ गालील सरोवराच्या ईशान्येकडील पर्वत] तुझ्या नावाचा जयजयकार करतात. [QBR]
13. तुला पराक्रमी भुज आहे आणि तुला बळकट हात आहे [QBR] व तुझा उजवा हात उंचावला आहे. [QBR]
14. निती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत. [QBR] कराराचा विश्वास आणि सत्य तुझ्यासमोर आहेत. [QBR]
15. जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत. [QBR] हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. [QBR]
16. ते दिवसभर तुझ्या नावाची स्तुती करतात, [QBR] आणि तुझ्या न्यायीपणाने ते तुला उंचावतात. [QBR]
17. त्यांच्या शक्तीचे वैभव तू आहेस, [QBR] आणि तुझ्या कृपेने आम्ही विजयी आहोत. [QBR]
18. कारण आमची ढाल परमेश्वराची आहे; [QBR] इस्राएलाचा पवित्र देव आमचा राजा आहे. [QBR]
19. पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास; [QBR] तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे; [QBR] लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे. [QBR]
20. मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे; [QBR] मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे. [QBR]
21. माझा हात त्यास आधार देईल; [QBR] माझा बाहू त्यास बलवान करील. [QBR]
22. कोणी शत्रू त्यास फसवणार नाही. [QBR] दुष्टांची मुले त्यास छळणार नाहीत. [QBR]
23. मी त्याच्या शत्रूंना त्याच्यापुढे चिरडून टाकीन; [QBR] जे त्याचा द्वेष करतात त्यांना मारून टाकीन. [QBR]
24. माझे सत्य आणि विश्वासाचा करार त्यांच्याबरोबर राहील; [QBR] माझ्या नावाने ते विजयी होतील. [QBR]
25. मी त्याचा हात समुद्रावर [QBR] आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन. [QBR]
26. तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता, [QBR] माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस. [QBR]
27. आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन, [QBR] पृथ्वीवरील राजांत त्यास परमश्रेष्ठ करीन. [QBR]
28. मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्वकाळ विस्तारील, [QBR] आणि त्यांच्याबरोबरचा माझा करार सर्वकाळ टिकेल. [QBR]
29. त्याचे वंश सर्वकाळ राहील, [QBR] आणि त्याचे राजासन आकाशाप्रमाणे टिकेल. [QBR]
30. जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले [QBR] आणि माझ्या आदेशाचा आज्ञाभंग केला. [QBR]
31. जर त्यांनी माझे नियम मोडले [QBR] आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. [QBR]
32. मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने, [QBR] आणि त्यांच्या अपराधांना फटक्यांनी शिक्षा करीन. [QBR]
33. परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही; [QBR] मी माझ्या वचनाशी निष्ठावान राहीन. [QBR]
34. मी माझा करार मोडणार नाही, [QBR] किंवा माझ्या ओठांचे शब्द बदलणार नाही. [QBR]
35. एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे, [QBR] आणि मी दावीदाशी खोटे बोलणार नाही. [QBR]
36. त्याची संतती सर्वकाळ राहील, [QBR] आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील. [QBR]
37. ते चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल. [QBR] आकाशात विश्वसनीय साक्षीदार आहेत. [QBR]
38. पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास, [QBR] तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस. [QBR]
39. तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास. [QBR] तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास. [QBR]
40. तू त्याच्या सर्व भिंती पाडून टाकल्यास. [QBR] तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस. [QBR]
41. सर्व येणारे जाणारे त्यास लुटतात. [QBR] तो आपल्या शेजाऱ्यांच्या तिरस्काराचा विषय झाला आहे. [QBR]
42. तू त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहे. [QBR] तू त्याच्या सर्व शत्रूंना आनंदित केले आहेस. [QBR]
43. तू त्यांच्या तलवारीची धार बोथट केली आहे. [QBR] आणि युद्धात त्यास तू टिकाव धरू दिला नाहीस. [QBR]
44. तू त्याच्या तेजस्वितेचा शेवट केला; [QBR] तू त्याचे सिंहासन जमिनीवर खाली आणलेस. [QBR]
45. तू त्याच्या तारुण्याचे दिवस कमी केले आहेत. [QBR] तू त्यास लज्जेने झाकले आहेस. [QBR]
46. हे परमेश्वरा, किती वेळ? तू आपल्या स्वतःला सर्वकाळ लपविणार काय? [QBR] तुझा राग अग्नीसारखा किती वेळ जळेल? [QBR]
47. माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर, [QBR] तू सर्व मानव पुत्र निर्माण केलेस ते व्यर्थच काय? [QBR]
48. कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही [QBR] किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवील? [QBR]
49. हे प्रभू, ज्या सत्यतेत तू दावीदाशी शपथ वाहिली, [QBR] ती तुझी पूर्वीची विश्वासाच्या कराराची कृत्ये कोठे आहेत? [QBR]
50. हे प्रभू, तुझ्या सेवकाविरूद्धची थट्टा होत आहे; [QBR] आणि अनेक राष्ट्राकडून झालेला अपमान मी आपल्या हृदयात सहन करत आहे हे तू लक्षात आण. [QBR]
51. हे परमेश्वरा, तुझे शत्रू जोराने अपमान करतात; [QBR] ते तुझ्या अभिषिक्ताच्या पावलांची थट्टा करतात. [QBR]
52. परमेश्वरास सदासर्वकाळ धन्यवाद असो. [QBR] आमेन आणि आमेन. [PE]