1. {#1देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुती }[PS]*प्रमुख गायकासाठी; मूथ लब्बेन रागावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. *[PE][PS]मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन; [PE][QS]मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन. [QE]
2. [QS]तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन, [QE][QS]हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन. [QE]
3. [QS]माझे शत्रू माघारी फिरतात, [QE][QS]तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात. [QE]
4. [QS]कारण तू माझ्या न्यायाला व माझ्या वादाला समर्थन केले आहे. [QE][QS]तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे. [QE]
5. [QS]आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहेस; [QE][QS]तू दुष्टाचा नाश केला आहेस. [QE][QS]तू त्यांचे नाव सर्वकाळपर्यंत खोडले आहे. [QE]
6. [QS]जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले, [QE][QS]तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. [QE][QS]त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे. [QE]
7. [QS]परंतु परमेश्वर अनंतकाळ असा आहे; [QE][QS]त्याने त्याचे राजासन न्यायासाठी स्थापिले आहे. [QE]
8. [QS]तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार, [QE][QS]राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे. [QE]
9. [QS]परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे, [QE][QS]संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे. [QE]
10. [QS]जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. [QE][QS]कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही. [QE]
11. [QS]सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. [QE][QS]ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा. [QE]
12. [QS]कारण देव, जो रक्तपाताचा सूड उगवतो, त्यांची आठवण आहे. [QE][QS]तो गरीबांचा आक्रोश विसरला नाही. [QE]
13. [QS]परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा. [QE]
14. [QS]म्हणजे मी तुझी स्तुती वर्णीन; [QE][QS]सियोन कन्येच्या दाराजवळ [QE][QS]मी तुझ्या तारणात हर्ष करीन. [QE]
15. [QS]राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडली आहेत; [QE][QS]त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे. [QE]
16. [QS]परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन. [QE]
17. [QS]दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल, [QE][QS]जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल. [QE]
18. [QS]कारण जो गरजवंत आहे, तो विसरला जाणार नाही. [QE][QS]किंवा पीडलेल्यांची आशा कधीच तोडली जाणार नाही. [QE]
19. [QS]हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मनुष्य आम्हांवर प्रबळ न होवो; [QE][QS]राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होऊ दे. [QE]
20. [QS]परमेश्वरा त्यांना भयभीत कर; [QE][QS]राष्ट्रे केवळ मर्त्य मनुष्य आहेत, हे त्यांना कळू दे. [QE][QSS]सेला. [QSE]