1. {देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुती} PS मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन;
मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन. |
4. कारण तू माझ्या न्यायाला व माझ्या वादाला समर्थन केले आहे.
तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे. |
5. आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहेस;
तू दुष्टाचा नाश केला आहेस. तू त्यांचे नाव सर्वकाळपर्यंत खोडले आहे. |
6. जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले,
तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे. |
10. जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात.
कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही. |
11. सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा.
ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा. |
13. परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा.
|
15. राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडली आहेत;
त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे. |
16. परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.
|