1. {#1देवाची अक्षयता व मानवाची क्षणभंगुरता }[PS]*मोशेचे स्तोत्र *[PE][QS]हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या[* एल-ओलाम ] [QE][QS]आमचे निवासस्थान आहेस. [QE]
2. [QS]पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी [QE][QS]किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच, [QE][QS]अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस. [QE]
3. [QS]तू मनुष्यास पुन्हा मातीस मिळवतोस, [QE][QS]आणि तू म्हणतोस, “अहो मनुष्याच्या वंशजांनो परत या.” [QE]
4. [QS]कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने, [QE][QS]कालच्या गेलेल्या दिवसासारखी, [QE][QS]रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. [QE]
5. [QS]पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, [QE][QS]सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत. [QE]
6. [QS]सकाळी ते उगवते आणि वाढते; [QE][QS]संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते. [QE]
7. [QS]खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो, [QE][QS]आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो. [QE]
8. [QS]तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत. [QE][QS]आमचे गुप्त पाप तुझ्या प्रकाशाच्या समक्ष ठेवले आहे. [QE]
9. [QS]तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते; [QE][QS]आमची वर्षे उसाशाप्रमाणे त्वरेने संपून जातात. [QE]
10. [QS]आमचे आयुष्य [† प्रताप ]सत्तर वर्षे आहे; [QE][QS]किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; [QE][QS]पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. [QE][QS]होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो. [QE]
11. [QS]तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; [QE][QS]तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो? [QE]
12. [QS]म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे [QE][QS]मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू. [QE]
13. [QS]हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील? [QE][QS]तुझ्या सेवकावर दया कर. [QE]
14. [QS]तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर [QE][QS]म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू. [QE]
15. [QS]जितके दिवस तू आम्हास पीडले त्या दिवसाच्या मानाने [QE][QS]आणि जितकी वर्षे आम्ही समस्येचा अनुभव घेतला त्या वर्षाच्या मानाने आम्हांला आनंदित कर. [QE]
16. [QS]तुझी कृती तुझ्या सेवकांना, [QE][QS]तुझे वैभव त्यांच्या मुलांना बघू दे. [QE]
17. [QS]प्रभू, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो. [QE][QS]आमच्या हातच्या कामाला उन्नती दे; [QE][QS]खरोखर, आमच्या हातच्या कामाला उन्नती दे. [QE]