1. {देवाची अक्षयता व मानवाची क्षणभंगुरता} [PS] हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या [* एल-ओलाम] [QBR] आमचे निवासस्थान आहेस. [QBR]
2. पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी [QBR] किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच, [QBR] अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस. [QBR]
3. तू मनुष्यास पुन्हा मातीस मिळवतोस, [QBR] आणि तू म्हणतोस, “अहो मनुष्याच्या वंशजांनो परत या.” [QBR]
4. कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने, [QBR] कालच्या गेलेल्या दिवसासारखी, [QBR] रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. [QBR]
5. पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, [QBR] सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत. [QBR]
6. सकाळी ते उगवते आणि वाढते; [QBR] संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते. [QBR]
7. खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो, [QBR] आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो. [QBR]
8. तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत. [QBR] आमचे गुप्त पाप तुझ्या प्रकाशाच्या समक्ष ठेवले आहे. [QBR]
9. तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते; [QBR] आमची वर्षे उसाशाप्रमाणे त्वरेने संपून जातात. [QBR]
10. आमचे आयुष्य [† प्रताप] सत्तर वर्षे आहे; [QBR] किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; [QBR] पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. [QBR] होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो. [QBR]
11. तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; [QBR] तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो? [QBR]
12. म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे [QBR] मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू. [QBR]
13. हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील? [QBR] तुझ्या सेवकावर दया कर. [QBR]
14. तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर [QBR] म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू. [QBR]
15. जितके दिवस तू आम्हास पीडले त्या दिवसाच्या मानाने [QBR] आणि जितकी वर्षे आम्ही समस्येचा अनुभव घेतला त्या वर्षाच्या मानाने आम्हांला आनंदित कर. [QBR]
16. तुझी कृती तुझ्या सेवकांना, [QBR] तुझे वैभव त्यांच्या मुलांना बघू दे. [QBR]
17. प्रभू, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो. [QBR] आमच्या हातच्या कामाला उन्नती दे; [QBR] खरोखर, आमच्या हातच्या कामाला उन्नती दे. [PE]