मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुती} [PS] परमेश्वराची उपकारस्तुती करणे [QBR] आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे. [QBR]
2. सकाळी तुझे वात्सल्य, [QBR] आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे. [QBR]
3. दहा तारांचे वाद्य, वीणेवर [QBR] आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे. [QBR]
4. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. [QBR] तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन. [QBR]
5. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, [QBR] तुझे विचार फार गहन आहेत. [QBR]
6. पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत, [QBR] किंवा मूर्खाला ती समजत नाहीत, [QBR]
7. दुष्ट गवताप्रमाणे उगवले, [QBR] आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले; [QBR] तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे. [QBR]
8. परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील. [QBR]
9. हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा; [QBR] सर्व वाईट करणारे विखरले आहेत. [QBR]
10. पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस; [QBR] मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे. [QBR]
11. माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे; [QBR] जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे. [QBR]
12. नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, [QBR] तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. [QBR]
13. जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत; [QBR] ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील. [QBR]
14. वृद्धपणातही ते फळ देत राहतील; [QBR] ते टवटवीत आणि हिरवे राहतील. [QBR]
15. हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे; [QBR] तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 92 / 150
स्तोत्रसंहिता 92:157
देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुती 1 परमेश्वराची उपकारस्तुती करणे आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे. 2 सकाळी तुझे वात्सल्य, आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे. 3 दहा तारांचे वाद्य, वीणेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे. 4 कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन. 5 हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, तुझे विचार फार गहन आहेत. 6 पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत, किंवा मूर्खाला ती समजत नाहीत, 7 दुष्ट गवताप्रमाणे उगवले, आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले; तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे. 8 परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील. 9 हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा; सर्व वाईट करणारे विखरले आहेत. 10 पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस; मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे. 11 माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे; जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे. 12 नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. 13 जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत; ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील. 14 वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते टवटवीत आणि हिरवे राहतील. 15 हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे; तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही.
Total 150 अध्याय, Selected धडा 92 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References